आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल:"स्वतःची तिजोरी फुल जनतेची मात्र दिशाभूल" नितेश राणेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधात असलेली भाजप या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. काही महिन्यातच आता राज्यात अनेक जिल्ह्यातील महानगर पालिका आणि जिल्हा बँकेच्या निवडणूका पार पडणार आहे. त्यामुळे दोघांकडून मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी सुरू आहे. आता पुन्हा भाजपचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

राणे यांनी व्यंगचित्र ट्विट करत थेट मुख्यमंत्री आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, कामगारांना मिळालेला बोनस आणि वाढती महागाई यातील तफावत दर्शवण्यात आली आहे. शिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी मंजूर झालेल्या निधी वाटपाचे चित्रही काढण्यात आले आहे. याला अनुसरुन 'वसूलीबाजीतून भरली स्वत:ची तिजोरी आणि जनतेच्या पदरी मात्र वाढून ठेवली दारिद्री. स्वतःची तिजोरी फुल आणि जनतेची मात्र दिशाभूल' असा टोला देखील राणे यांनी ठाकरे यांना लगावला आहे.

दरम्यान, भाजपा आणि महाविकास आघाडीतील राजकीय नेते कोणत्याही कारणाने एकमेकांवर सातत्याने टीका करतांना पाहायला मिळत आहे. आता नितेश राणे यांच्या या ट्वीटमुळे ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देते याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...