आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • BJP On Mahavikas Aghadi Government: Bring Out A White Paper Of Mahavikas Aghadi Government's Work In Two And A Half Years, BJP State President Chandrashekhar Bawankule Demanded.

'मविआ'च्या अडीच वर्षांतल्या कामांची श्वेतपत्रिका काढा:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांतल्या कामांची विषयनिहाय श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप विरोधक करतायत. त्यामुळे कोणाच्या काळात महाराष्ट्र मागे गेला, हे समोर यावे, असे आव्हानच भाजपने दिले आहे.

काय म्हणाले बावनकुळे?

बावनकुळे म्हणाले की, मागच्या अडीच वर्षांतली एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. अडीच वर्षांत हा महाराष्ट्र कुठल्या-कुठल्या विषयांमध्ये मागे गेला, ही श्वेतपत्रिका सरकारने काढावी, अशी मागणी मी केलीय. विजेच्या विषयावर किती मागे गेला महाराष्ट्र, उद्योगावर किती मागे गेला, सिंचनावर किती मागे गेला, पीक विम्यावर किती मागे गेला, हे समोर यावे.

पळता भुई थोडी...

बावनकुळे पुढे म्हणाले की, अडीच वर्षांचा प्रत्येक विषयाचा बॅकलॉक काढला ना, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पळता भुई थोडी होईल. या श्वेतपत्रिकेची मी विधान परिषदेतही मागणी करणार आहे. मागच्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने विषयासह प्रत्येक विषयात महाराष्ट्र कुठे नेऊ ठेवला, हे समोर आलेच पाहिजे.

समान अधिकार असावा...

बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विचार मांडला आहे की, संविधानाने समान नागरी कायदा १९५० मध्येच सांगितला आहे. राज्यामध्ये तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घोषित करावा लागेल. अनेक राज्यांनी ही भूमिका स्वीकारलीय. संविधानामध्ये जे लिखित आहे, त्यानुसार सर्वांना समान अधिकार असला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...