आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • BJP On Thackeray:List The Projects That Came Up During The Father's Time; BJP Challenges Aditya Thackeray Again By Calling Him Bolbachan

भाजपचे आदित्य ठाकरेंना आव्हान:'मविआ'च्या काळात आलेल्या प्रकल्पांची यादी मागितली; तर बोलबच्चन म्हणून डिवचले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीच्या काळात आलेल्या प्रकल्पांची यादी द्या, असे आव्हान भाजपने पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पांच्या पळवापळवीवरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे वाकयुद्ध रंगले आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून नेले जात असल्याचा आरोप विरोधक करतायत. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. फडणवीसांना आदित्य ठाकरेंनी दुसरी पत्रकार परिषद घेत तातडीने उत्तर देत महाराष्ट्राची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा भाजपने एक ट्विट करून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.

लेव्हल तरी आहे का?

महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरून आदित्य ठाकरेंना थेट बोलबच्चन म्हणत डिवचले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, तोंडातून आवाज निघत नाही, म्हणे समोरासमोर डिबेट करण्यासाठी बसा. पगार किती, बोलतो किती? लेव्हल तरी आहे का? तिसरा दिवस आहे बोलबच्चन.@AUThackeray आदित्य ठाकरे, स्वतःच्या वडिलांच्या काळात आलेल्या प्रकल्पाची यादी देतच आहेस, असे म्हणत पुन्हा एकदा यादी देण्याचे आव्हान दिले आहे.

व्हिडीओ केला पोस्ट

भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यात एका पत्रकाराने आदित्य ठाकरे यांना एक प्रश्न विचारला आहे. ते म्हणतात, आदित्य उपमुख्यमंत्र्यांचे एक आव्हान आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात किती उद्योग आले, किती प्रकल्प आले. त्याची आकडेवारी, किती रोजगार निर्माण झाले याची आकडेवारी जाहीर करू शकता का? या प्रश्नावर आदित्य यादी आणि आकडेवारी जाहीर करू म्हणतात.मात्र, हा प्रश्न विचारूनही दोन दिवस झाले. आज तिसरा दिवस आहे. ही यादी आणि आकडेवारी केव्हा जाहीर करणार, असा सवाल भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...