आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा केली. यानंतर महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नाही अशा चर्चा सुरू झाल्या. महाविकास आघाडीमधील तीन पक्षांमध्येच एकमत नाही यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने निशाणा साधला जातोय. आता पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी सत्ताधाऱ्यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावरुन निशाणा साधला आहे.
बळबळ करणाऱ्यांना जनता पळ काढायला लावेल
मला वाटतं यांना पक्षाच्या स्वबळाचे पडलेले आहे. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची ताकद राहिलेली नाही. त्यांच्या बाहूत बळ लाहिलेले नाही.कामगार देशोधडीला लागतोय. कामगारांच्या बाहूत बळ राहिलेले नाही. पण यांना स्वबळाचं पडलेले आहे. हे असेच सत्तेभोवती पिंगा घालत बसले तर असे बळबळ करताना ही जनता त्यांना बळ काढायला लावल्याशिवाय राहणार नाही. लोणावळ्यातील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे भाष्य केले.
एकमेकांना शिव्या देतात आणि सोबतच नांदताय
पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, 'यांना केवळ आपले सरकार कसे टिकवता येईल याची चिंता आहे. हे एकमेकांना शिव्या पण देतात आणि एकमेकांसोबत नांदतायत पण. म्हणजे आज शिव्या देतात, संध्याकाळी भेटतात, उद्या पुन्हा वेगळे बोलायला लागतात. त्यांना लाज-शरम काहीच वाटत नाही. तुम्ही तुमच्या स्वबळाचे काय करायचे ते करा, पण जर अशा पद्धतीने राज्याच्या जनतेचा छळ झाला आणि त्यांच्याच हातात बळ राहिले नाही, तर ही जनता तुम्हाला पळ काढायला लावल्याशिवाय राहणार नाही'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.