आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा आरोप:​​​​​​​सामनामधून संजय राऊत वाझेंना पाठीशी घालण्याचे काम करताय, त्यांचे काही साटेलोटे आहेत का? प्रविण दरेकरांचा सवाल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विसंवादाने भरलेले या तिन्हीही पक्षांमधील वातावरण आहे

उद्योगजक अंबानी यांचे घर अँटिलिया बाहेर रस्त्यावर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. या प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर हे प्रकरण रोज नवीन वळण घेत आहे. या प्रकरणावरुन भाजपकडून सातत्याने शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. आता पुन्हा एकदा विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

संजय राऊत वाझेंची पाठराखण का करत आहेत?
'सामनामधून संजय राऊत यांनी सर्व काही आलबेल असल्याचे म्हटले आहे. सर्व काही विस्कळलेले असताना आलबेल असल्याची भूमिका मांडली जात आहे. कारण याच प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री जे पोलिस प्रशासनाचे सरकारचे प्रमुख आहेत. त्यांनीच त्या ठिकाणी सांगितले की, काही महत्त्वाच्या चूका झाल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारची बदली करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजुला वाझेच्या प्रकरणात काँग्रेस म्हणतेय की, चुक झाली असेल तर कोणताही मोठा अधिकारी असो त्यावर कारवाई झाली पाहिजे. मग दोन पक्षांची भूमिका अशी असताना संजय राऊत वाझेंची पाठराखण करण्याचा प्रयत्न का करत आहेत? यावरुन संशय येतोय.' अशी शंका प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

अँटिलिया प्रकरणाच्या सूत्रधाराची कहाणी, एकेकाळी बाळासाहेबांच्या जवळचे होते वाझे

तिन्हीही पक्षात विसंवाद आहे
भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीवर तिन्ही पक्षातील विसंवादावरुन टीका केली जात असते. आता पुन्हा एकदा वाझे प्रकरणावरुन प्रविण दरेकरांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. 'या ठिकाणी काहीच आलबेल नाही. विसंवादाने भरलेले या तिन्हीही पक्षांमधील वातावरण आहे. खासकरुन वाझे प्रकरणामध्ये तिन्हीही पक्षांमध्ये विसंवाद आहे असा आरोप प्रविण दरेकरांनी केला आहे.

काही साटेलोटे आहेत काय?

'राज्याच्या गृहमंत्र्यांनीच स्वीकार केले की, मेजर चुका झाल्या आहेत. म्हणजेच सरकार म्हणूनच चुका झाल्या आहेत. पण तरीही यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असेल तर यांचेच काही साटेलोटे आहेत काय याविषयावर संशय बळावतो. जे पाठीशी घालताय त्यांचच काही तरी या प्रकरणामध्ये साटेलोटे आहे.' असे म्हणत प्रविण दरेकरांनी संजय राऊतांकडे बोट दाखवले आहे.

बातम्या आणखी आहेत...