आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुषार गांधींचे वक्तव्य दुकान चालवण्यासाठी:भाजपचे प्रत्युत्तर; दगलबाज शिवाजी पुस्तकावर काय म्हणायचे आहे, उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावरकरांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला बंदूक दिली, असे वक्तव्य केवळ आपले दुकान चालवण्यासाठी केले जात आहे, असे प्रत्युत्तर भाजपने महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना दिले.

आरोप बेछूट

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भूमिका स्पष्ट केली. उपाध्ये म्हणाले, सावरकरांनी गोडसेला बंदूक दिली की नाही, याबाबत कोर्टात स्पष्ट झाले आहे. मात्र, बेछूट आरोप करणे काही जणांची खासियत आहे. त्याशिवाय त्यांचं दुकान चालत नाही. त्या भूमिकेतूनच हे आरोप करण्यात आले आहेत.

'दगलबाज शिवाजी' नावाचं पुस्तक

शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ठाकरे गटाकडून राज्यपालांसोबत भाजपवरही टीका केली जात आहे. त्यावर केशव उपाध्ये म्हणाले, प्रबोधनकार ठाकरेंनीच 'दगलबाज शिवाजी' या नावाने पुस्तक लिहिले आहे. त्याबद्दल ठाकरेंना काय म्हणायचे आहे. आता उगीचच हे वाद काढण्यात अर्थ नाही.

उद्धव ठाकरेंचा विनोद

काल मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साद घातली. लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र येऊ, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केली. त्यावर केशव उपाध्ये म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हव, हा उद्धव ठाकरेंनी केलेला सर्वात मोठा विनोद आहे. उद्धव ठाकरेंना लोकशाहीची चिंता नसून उरलासुरला पक्ष वाचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यासाठी असे विविध लेबल लावण्याचा प्रयत्न ते करत आहे.

शिवसेनेने गुडघे ठेकले

केशव उपाध्ये म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतल्याशिवाय स्वत:च्या कतृत्वावर उद्धव ठाकरेंना काहीच करता येत नाही. अशा उद्धव ठाकरेंनी लोकशाही वाचवण्याचा गप्पा करणे हा मोठा विनोद आहे. उरलासुरला पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे जमेल त्याच्याशी युती करत आहेत. संवादावर विश्वास नसणाऱ्या, दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संभाजीब्रिगेडशी ठाकरेंनी युती केली. नक्षलवाद्यांच समर्थन करणाऱ्यांशीही त्यांनी युती केली. वीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेससमोर शिवसेनेने गुडघे ठेकले. सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससमोर स्वाभिमान सोडून दीला. ते आता लोकशाही वाचवण्याच्या गप्पा करत आहे.

मातोश्रीवरचे किस्से सर्वांना माहित

केशव उपाध्ये म्हणाले, ठाकरेंनी स्वत:च्या पक्षात तरी लोकशाही आहे का?, याचा विचार करावा. मातोश्रीवरचे किस्से सर्वांना माहित आहे. भेटीसाठी येणाऱ्यांना तास तास ताटकाळत ठेवणे, भेट न देणे, अशी ठाकरेंची वागणूक आहे. त्यांच्या अशा वागणुकीमुळेच त्यांना आमदार सोडून दिले. आता पक्ष संकटात सापडल्यामुळे कोणताही विचार न करता ते सर्वांशी युती करत आहेत.

साडीबद्दल मौन का?

केशव उपाध्ये म्हणाले, सुप्रिया सुळे यांनी आज महिला पत्रकारी साडी का नेसत नाही?, असे वक्तव्य केले. त्यांचे वक्तव्य येऊन 24 तास उलटून गेले. मात्र, टिकलीवरून ज्या पद्धतीने टीका करण्यात आली, तसे एखादे वक्तव्यही सुप्रिया सुळेंबाबत अजून कुणी केले नाही. आता सर्व गप्प का आहेत?. टिकलीवरून पेटून उठायचे आणि साडीवर कुणी बोलले तर गप्प राहायचे ही ढोंगी भूमिका आहे.

राज्यपालांना तसे म्हणायचे नव्हते

केशव उपाध्ये म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज देशाला प्रेरणा देणारे नेतृत्व आहे. याबाबत राज्यपालांच्या मनातही शंका नाही. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यपालांचा राजीनामा मागणे, हे विरोधकांचे कामच आहे.

बातम्या आणखी आहेत...