आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता ठाकरे गटाने जाहीर केलेल्या शिवसंवाद यात्रेविरोधात शिवसेना-भाजप युतीने रणशिंग फुंकले आहे. शिवसेना-भाजप युती आशीर्वाद यात्रा काढणार असून रविवारपासून (ता.५) या यात्रेला सुरुवात होणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यासंदर्भातील घोषणा मुंबईत शनिवारी (ता.४) पत्रकार परिषदेत केली.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच शिवसंवाद यात्रेची घोषणा केली. या यात्रेच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी भाजपवर विशेष करून शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्याला उत्तर देण्यासाठी आता शिवसेना आणि भाजपने रणनीती आखली आहे. त्यानुसार भाजपकडून आशीर्वाद यात्रेची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
जाणता राजाचे प्रयोग १४ ते १९ मार्च दरम्यान दादर येथील शिवतीर्थ मैदानावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्याचे प्रयोग ठेवण्यात आले आहे. हे प्रयोग सर्वांना नि:शुल्क पाहता येणार असून १० हजार नागरिक ते पाहतील, असा अंदाज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.