आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OBC आरक्षण वाद:ओबीसी नेते मोठ्या पदावर जात असल्याने पोटात दुखतंय, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी नेते मोठ्या पदावर जात असल्याने राज्य सरकारच्या पोटात दुखतंय अशी जहरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ओबीसीचे संरक्षण असल्याचा सरकारचा बुरखा फाडायला हवे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. ओबीसीचे नेते मोठ्या पदावर जाऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचेही भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
राज्यभरात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ओबीसी होत आहेत, मनपाच्या महापौरपदी ओबीसी बसत आहेत, यामुळे राज्य सरकारच्या पोटात दुखत आहे. अशी जहरी टीका पाटील यांनी केली आहे. राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी आपन प्रयत्न करायला हवेत असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान सरकारच्या नाकर्ते पणाने ओबीसी आरक्षण गेले असले तरी आम्ही ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार आहोत. अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनीही केली आहे.

ओबीसींच्या भरवश्यावर भाजप मोठा झाला - फडणवीस
न्यायालयाने अनेकदा सांगून राज्य सरकारने ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी काही केलेच नाही, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपचा निर्धार आहे की, ओबीसी आरक्षणाचा आमचा लढा आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे. यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी लढा सुरुच राहील. तोपर्यंत ज्या निवडणुका येतील, त्या निवडणुकांमध्ये आम्ही 27 टक्के तिकीट ओबीसींनाच देणार हा भाजपचा निर्धार आहे. भाजप हा ओबीसींचा पक्ष आहे. ओबीसींच्या भरवश्यावर मोठा झालेला पक्ष आहे. त्यामुळे आम्ही कायम ओबीसीच्या पाठिशी राहू असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...