आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप प्रदेशाध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला:म्हणाले- राज ठाकरे आणि आमच्यात वैचारिक साम्य; उद्धव आता हिंदुत्ववादी राहिले नाहीत!

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे हे मोठ्या भावाप्रमाणे आहेत, भाजपच्या प्रदेशाघ्यक्षपदी निवड झाल्याने त्यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि आमच्यात वैचारिक साम्य आहे. मात्र, युतीचा निर्णय फडणवीस नड्डा आणि शहा घेतील असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आमच्या भेटीचे राजकीय अर्थ काढू नये असेही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

पारिवारीक प्रेमामुळे उद्धव ठाकरे सर्व गोष्टी विसरले आहेत, बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी बगल देत आपले कर्तृत्व उद्धव ठाकरे करत आहेत, ते आता हिंदुत्ववादी राहिले नाही, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी आहे, ते कुटुुंबीयांच्या प्रेमात सर्व काही विसरले आहेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांची उपस्थिती होती. शिवसेनेकडे आता इव्हेट मॅनेजमेंट सुरू आहे, त्यांतून ते सर्व गोष्टी करत आहे. संघाचे कार्यकर्ते गेले असे मला वाटत नाही.

मात्र, संघाच्या कट्टर विरोधी विचारसरणीच्या असणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत ते युती करतात. आणि स्वत:ला हिदुंत्ववादी म्हणातात का असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला आहे. संध्या ते गडबडलेल्या भूमिकेत आहे, त्यांची भूमिका काहीच कळत नाही, शरद पवार आणि काँग्रेससोबत बसणाऱ्यांनी हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यांच्यावर बोलून काहीच फायदा नाही असे म्हणतानाच बावनकुळें म्हणाले की, पुढच्या काळात मतदानाच्या वेळी जनता ठरवेल की खरे कुणोच आणि खोटे कुणाचे.

भेटीचा राजकीय अर्थ नको

राज्यातील वैचारिक साम्य असलेल्या नेत्यांशी मी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष झाल्याने भेट घेत आहे, युतीचा संदर्भातील निर्णय केद्रातील नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस हे ठरवतील. मी केवळ संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करणार आहे असे सांगताना ते राज ठाकरे हिंदुत्वाचे रक्षण करणारे नेते आहेत म्हणून मी त्यांची भेट घेतली आहे.

बावळकुळेंचा पवारांवर हल्लाबोल

शरद पवारांनी अनेकदा महाराष्ट्र पिंजून काढला आहे, मात्र ते 60 च्यावर उमेदवार निवडून आणता आले नाही, ते फिरत असताना लोक त्यांना विचारतील की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा टोला बावनकुळेंनी त्यांना लगावला आहे. मागील अडीच वर्षांतते फिरले का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर पवार जेव्हाही सत्तेत आले तेव्हा कुणाला ना कुणाला संपवूण आले असा टोला बावनकुळेंनी पवारांना लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...