आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत गीतेंच्या वक्तव्यावर भाजप:शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणे म्हणजे हे पॉलिटिकल सुसाईड, ही युती नकोच - सुधीर मुनगंटीवार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊत हे शिवसेनेचे आहेत की, राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल

शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे हे सरकार फक्त सत्तेसाठी केलेली तडजोड आहे. शिवसेना कधीही काँग्रेसी विचाराची होऊ शकत नाही नसल्याचे गीते म्हणाले आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता सुधिर मुनगंटीवार यांनीही गीतेंच्या सुरात सूर मिळवत भाष्य केले आहे.

टीव्हीनाइन वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ' संजय राऊत हे शिवसेनेचे आहेत की, राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल. राऊत हे उद्धव ठाकरेंचे जेवढे कौतुक करत नाहीत यापेक्षा जास्त ते शरद पवारांचे कौतुक करत असतात. मात्र मी हमखास सांगतो की, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा, त्यातून एकच आवाज बाहेर येईल की, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणे म्हणजे हे पॉलिटिकल सुसाईड आहे, ही सुती नकोच'

काय म्हणाले होते अनंत गीते?
'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून झालेला आहे. शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत. आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच आहेत.' तसेच पुढे म्हणाले की, 'काँग्रेस देखील काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील काँग्रेसच आहे. मात्र तरीही त्यांचे एकमेकांसोबत कधी जमत होते का? या दोन्ही पक्षांचा विचार एक आहे का? जर दोन काँग्रेस या एक होऊ शकत नाहीत, तर मग शिवसेना ही काँग्रेस विचारांची कधीच होऊ शकत नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म हा काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दुसरा कोणत्याही नेत्याला कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणत असेल, पण तो आमचा गुरु होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही केवळ सत्तेसाठी तडजोड आहे'

बातम्या आणखी आहेत...