आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:राष्ट्रवादीला बाजूला सारत शिवसेनेची भाजपशी हात मिळवणी, पारनेरमधील कुरघोडीला कल्याणमधून उत्तर

कल्याण2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पारनेर जिल्ह्यातील कुरघोडीच्या राजकारणाची परफेड म्हणऊन राष्ट्रवादीला काँग्रेसला झटका दिला आहे.
  • भाजपानं विनाअट शिवसेनेला जाहीर पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडून शिवसेनेला शह देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेनं कल्याणमध्ये डच्चू दिला आहे. कल्याण पंचायत समितीमध्ये शिवसेनेनं थेट भाजपशी हातमिळवणी केली आहे. तर राष्ट्रवादीला काँग्रेसला मात दिली आहे. 

कल्याण पंचायत समितीमध्ये शिवसेनेनं थेट भाजपाशी हातमिळवणी केली. तर पारनेर जिल्ह्यातील कुरघोडीच्या राजकारणाची परफेड म्हणऊन राष्ट्रवादीला काँग्रेसला झटका दिला आहे. नुकतीच कल्याण पंचायत समितीची सभापती आणि उपसभापती निवडणूक पार पडली. याठिकाणी भाजपाचे 5, शिवसेनेचे 4, राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक आहेत.    शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यात एकत्रित सत्तेत आहेत. यामुळे पंचायत समितीत शिवसेना-राष्ट्रवादीचे सभापती-उपसभापती सहज निवडून येतील अशा चर्चा होत्या. मात्र येथे भाजपने शिवसेनेचा हात धरत सत्ता काबीज केली आहे. 

सभापती आणि उपसभापती पद राष्ट्रवादीला देणार असल्याचं हे जवळपास निश्चित करण्यात आलेलं होतं. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी रविवारी राजकीय डावपेच बदलले. भाजपा आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधला आणि भाजपानं विनाअट शिवसेनेला जाहीर पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. भाजपाच्या 5 सदस्यांच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांना सात मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांना 5 मतांवर समाधान मानावं लागलं. उपसभापती शिवसेनेचे रमेश बांगर विजयी झाले. त्यांनाही 7 मते मिळाली. तर याठिकाणीही राष्ट्रवादीच्या भरत भोईर यांचा पराभव झाला. 

नुकतेच पारनेरमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले होते 

पारनेरमध्ये राष्ट्रवादीने चांगलेच डावपेच खेळले. आता याच डावपेचांना शिवसेनेने कल्याण पंचायत समितीमधून उत्तर दिलं असल्याचं बोललं जात आहे. पारनेरमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे सत्ताधारी पक्षविस्ताराची स्पर्धा सुरू झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता यामध्ये शिवसेनाही मागे नाही. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतील हे स्थानिक मतभेत राज्य पातळीपर्यंत जातात की, स्थानिकपर्यंतच राहतात हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...