आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेलारांचा सरकारवर निशाणा:दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून कट रचत असताना राज्याचं एटीएस काय झोपलं होतं का? भाजपचा राज्य सरकारला संतप्त सवाल

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशिष्ट वर्गासाठी राज्य सरकार मवाळ भूमिका तर घेत नाही ना?

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीतून एकूण 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांचा आयएसआय आणि अंडरवर्ल्ड मॉड्यूलशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याची माहिती मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरुन आता भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत येऊन जान मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी याविषयी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट रचत होते. या काळात राज्याचे एटीएस झोपले होते का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलिस काय करत होते? असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे.

विशिष्ट वर्गासाठी राज्य सरकार मवाळ भूमिका तर घेत नाही ना?
आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत सवाल उपस्थित केले आहे. विशिष्ट वर्गासाठी राज्य सरकार मवाळ भूमिका तर घेत नाही ना? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. तसेच मुंबईत, धारावीमधून अशा दहशतवाद्यांचा निवास, कटकारस्थान करणे सुरु होते. या दहशतवाद्याला दिल्लीहून येऊन विशेष पथकाने अटक केली. मग राज्यातील एटीएस काय झोपलं होतं का? अदखलपात्र गुन्ह्यात केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे, पत्रकारांना हात नाही पाय लावू असे म्हणत असणारे किंवा राज्यातल्या विद्यमान आमदाराविरोधात लुकआऊट नोटीस काढणारे आमचे पोलिस या दहशतवाद्यांच्या बाबतीत काय करत होते. असा खोचक सवाल देखील शेलारांनी केला.

गृहमंत्र्यानी चौकशी वाढवावी
या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील शेलारांनी केली आहे. ते म्हणाले या सर्व प्रकरणाची माहिती राज्याच्या पोलिसांना, गृहमंत्र्यांना होती का? यासोबतच माहिती असेल तर त्यावर त्यांनी काय भूमिका घेतली? की मग विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असे राजकीय प्रकरण तर नाही ना? गृहमंत्र्यांनी आपल्या इंटेलिजन्स फेल्युअरवर भूमिका स्पष्ट करावी, आणखी काही लोकं राज्यात लपली आहेत का? याबाबतीतली चौकशी वाढवावी, असे देखील शेलारांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...