आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांसाठी राज्यात लागू असलेल्या पीक विम्याची अंमलबजावणी केंद्र सरकारच्या गाइडलाइननुसार हाेत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, यासाठी निकषात बदल करणे, अंमलबजावणीतील नियमात बदल करण्यासाठी केंद्र सरकारबराेबर बाेलणी सुरू आहे. त्या दृष्टीने एक प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. दरम्यान, यावर समाधान झाल्याने भाजप सदस्यांनी सभात्याग केला.
शुक्रवारी सकाळी प्रश्नाेत्तराच्या तासात आमदार कैलास घाडगे, राणा जगजितसिंह पाटील, ज्ञानराज चाैगुले यांनी एका प्रश्नाद्वारे शेतकरी पीक विम्याबाबत येणाऱ्या अडचणी सभागृहात मांडल्या. त्यावर उत्तर देताना भुसे यांनी सांगितले, याेजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीस कळवणे आवश्यक आहे. तथापि, याेजनेच्या अंमलबजावणीबाबत आयाेजित आढावा बैठकीत वेळाेवेळी उशिरा दिलेल्या पूर्वसूचनेबाबत सर्वेक्षण करून नुकसान भरपाईबाबत कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विमा कंपनीला देण्यात आले आहेत. त्यानुसार विमा कंपनी कार्यवाही करत आहे. भाजप सदस्यांनी कृषिमंत्री चुकीची माहिती देत आहेत, या सरकारने विम्याचे पैसेच भरलेले नाहीत, असा आराेप केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.