आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी जबाबदारी:विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय महामंत्री पदी नियुक्ती, मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज काही संघटनात्मक नियुक्ता केल्या आहेत. त्यात विनोद तावडे यांना संधी देण्यात आली आहे. भाजपने विनोद तावडे यांना महाराष्ट्र राष्ट्रीय महामंत्री करत असल्याचे जाहीर केले आहे. सोबतच बिहारसाठी ऋतुराज सिन्हा, झारखंडसाठी आशा लाकडा यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून भारती घोष आणि शहजाद पुनावाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

तावडे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी

भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर ते काही काळ राजकारणातून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता विनोद तावडे यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश होत असून, भाजपने त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यांना महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय महामंत्री करत भाजपने पुन्हा एकदा बळ देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. कारण मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे. पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांची नियुक्ती महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.

विनोद तावडे कोण आहेत?
विनोद तावडे हे आखिल विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी चळवळीतून राजकारण आले आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी, तेवढाच बुद्धिमान आणि धूर्त नेता म्हणून विनोद तावडे यांची ओळख आहे. विनोद तावडे यांनी 1985 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कामाला सुरूवात केली. यानंतर विनोद तावडे यांनी एकएक पायरी चढत महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या यादीत स्थान मिळवले.

नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे या दोन बड्या नेत्यांच्या सावलीत राहून त्यांनी भाजपमध्ये स्वत:चे भक्कम स्थान निर्माण केले. 1995 मध्ये राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा भाजपच्या वर्तुळात विनोद तावडे यांच्याभोवती प्रचंड वलय होते. मात्र, 2014 पासून विनोद तावडे यांच्याभोवतीचे हे वलय हळूहळू फिकट होताना पाहायला मिळाले. शिक्षणमंत्री म्हणून त्यांचे अनेक निर्णय आणि वक्तव्ये वादग्रस्त ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...