आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पटोलेंचा पंतप्रधानांवर निशाणा:मोदी हे गुजरातमध्ये झालेली दंगल मान्य करतील का? भाजप यासाठी माफी मागणार का? नाना पटोलेंचा थेट पंतप्रधानांना सवाल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये लागू झालेली आणीबाणी चुकीची होती, असे त्यांचे नातू आणि काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते. यानंतर आता नाना पटोलेंनी थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आणीबाणी चूक ही प्रांजळपणे मान्य केली आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये झालेली दंगल मान्य करतील का? भाजप यासाठी माफी मागणार का? असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थितीत केला आहे.

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी चुकीची होती, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. कॉर्नेल विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बुधवारी कौशि बसु यांच्यासोबत व्हर्च्युअल चर्चेत राहुल गांधींनी हे वक्तव्य केले आहे. मात्र हे वक्तव्य त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचा संदर्भात देत केले आहे. आणीबाणी चुकीची होती, मात्र त्यावेळी जे झाले आणि आज देशात जे होत आहे यामध्ये काय फरक आहे असा सवालही राहुल गांधींनी विचारला आहे.

याविषयावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, 'राहुल गांधी यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे ती नक्कीच गांधीवादी आहे. त्यांनी कोणत्या अहंकारातून हे विधान केले नाही. त्यांनी गोडसेप्रेमी भक्तांप्रमाणेही केलेले नाही. आणीबाणीच्या काळात लोकांना जो त्रास झाला त्याबद्दल त्यांनी एकाप्रकारे माफी मागितली आहे. मात्र देशावर सर्वात मोठा कलंक हा गुजरातमधील गोंध्रामधील दंगलमुळे लागला होता. हिंदू-मुस्लिम यांच्यात जो रक्तपात झाला होता. त्याविषयी भाजप माफी मागणार आहे का?' असा थेट सवाल नाना पटोलेंनी विचारला आहे.

बातम्या आणखी आहेत...