आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक:भाजप यापुढे 100 टक्के क्षमता वापरणार, रणनीती चुकल्याचे मान्य, विधान परिषद पराभवावर चिंतन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या निवडणुकीत अोढवलेल्या दारुण पराभवावर प्रदेश कार्यालयात शुक्रवारी सकाळी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या निवडणुकीत झालेल्या चुका यापुढे टाळण्यात याव्यात तसेच यापुढे पक्षाने १०० टक्के क्षमता वापरावी, असे या बैठकीत ठरले. शुक्रवारची बैठक पूर्वनियोजित होती. ती विधान परिषदेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर झालेली नाही. तरी या बैठकीत विधान परिषद निवडणूक पराभवावर पुसटशी चर्चा झाली. आम्ही ठेवलेल्या अपेक्षा चुकीच्या होत्या, यापुढे पक्ष शंभर टक्के क्षमतांचा वापर करेल, असे बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी सांगितले. या बैठकीत भाजपची राज्यातील आगामी काळातील ध्येय, धोरणे आणि पक्षाची पुढील वाटचाल यावर चर्चा झाली. तसेच पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा राज्यातील आगामी दौरा यावर सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. बैठकीत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकीतील रणनीती अपयशी ठरल्याचे मान्य केले. राज्याचे प्रभारी सी. टी. रवी यांनी विधान परिषदेच्या निकालांवर बैठकीत आश्चर्य व्यक्त केल्याचे समजते. राज्य प्रभारी झाल्यानंतर रवी यांचा हा राज्याचा पहिलाच दौरा आहे.

रवी हे कर्नाटकातील चिकमंगळूरचे भाजप आमदार आहेत. विधान परिषदेच्या या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलेला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील असे दोन्ही पारंपरिक मतदारसंघ भाजपने गमावले आहेत. दरम्यान, या पराभवानंतर भाजप आता पुन्हा नव्याने पक्षबांधणी करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपला आता या पराभवातून बोध घ्यावा लागेल, असे सांगण्यात येते.

स्वतंत्रपणे चिंतन बैठक घेणार
विधान परिषदेत झालेल्या पक्षाच्या दारुण पराभवावर स्वतंत्रपणे चिंतन बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीला राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांच्यासोबत, सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंह पवैया, संघटन सरचिटणीस विजय पुराणीक, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरिश महाजन, पंकजा मुंडे, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser