आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची तुलना बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्याशी करणे भाजप कार्यकर्त्याला महागात पडले आहे. त्याला अटक करण्यासाठी पुण्यातून पोलिसांचे पथक मुंबईत पोहोचले. मुंबईत असलेल्या आणि भाजपच्या सोशल मीडिया सेलचा इंजार्ज असलेल्या जितेन गजारिया याच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक
गजरियाचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील कोरपखैरणे परिसरातून भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली. त्यांनी फेसबूकवर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
दरम्यान, गुरुवारी सायबर पोलिसांनी गजारिया याची तब्बल साडे चार तास चौकशी केली. या चौकशीनंतर गजरियाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण, त्याचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी दावा केला होता की गजरियाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही. केवळ प्राथमिक तपास म्हणून ही चौकशी झाली. पण, यानंतर शुक्रवारी त्याला मुंबईतूनच पकडण्यासाठी पुणे पोलिस ठाण मांडून आहेत. गजरियाने नुकतेच एक ट्विट करून रश्मी ठाकरे यांना 'मराठी राबडीदेवी' (#MarathiRabriDevi) असे म्हटले होते. त्यावरून सोशल मीडियावर मोठा वाद झाला होता.
माझे क्लाइंट रश्मी ठाकरेंचा सन्मान करतात
गजरियाचे वकील गुप्ता यांनी दावा केला की त्यांचे क्लाइंट गजरिया रश्मी ठाकरे यांचा खूप आदर सन्मान करतात. शिवसेना नेत्यांनीच म्हटले होते की ठाकरे सरकार रश्मी ठाकरे यांच्याकडून चालवले जात आहे. त्यामुळे, माझ्या क्लाइंटने तसा उल्लेख केला होता.
पुण्यात गुन्हा दाखल करून कारवाई
गजरियाने केलेल्या ट्विटनंतर पुण्यातील सायबर पोलिस विभागाने भारतीय दंड विधानाच्या कलम 153A (समाजात विविध वर्गाच्या लोक, धर्म, जात आणि भाषेच्या आधारे वैमन्यस वाढवणे), कलम 500 (मानहानी), कलम 505 (गुन्हेगारी आशयातून खोटे बोलणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाकडून तीव्र विरोध
या अटकेचा भाजपचे मुंबईतील नेते राम कदम यांनी विरोध केला. महाराष्ट्र सरकारकडून लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. भाजप खासदार हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नेत्यांविरुद्ध काहीच कारवाई केली जात नाही. पण, भाजप कार्यकर्ता आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून ट्विट करतो तेव्हा पोलिसांच्या माध्यमातून छळ केला जातो. महाराष्ट्र सरकार वसूलीच नव्हे तर राजकीय सूड उगवण्यासाठी सुद्धा पोलिसांचा गैरवापर करत आहे असा आरोप राम कदम यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.