आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:भाजपचे मुंबई महानगरपालिकेतील 20 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीला कंटाळलेले भाजपमधील १५ ते २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून डिसेंबरमध्ये धमाका होईल, असा खळबळजनक दावा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सोमवारी (ता. १८) केला. भाजपने स्वप्नातून बाहेर पडावे, अशी खोचक टीकाही जाधव यांनी केली.

मुंबई महापालिका निवडणूक चार महिन्यांवर आली असल्याने पालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अन्याय झालेल्यांना शिवसेना नेहमीच आधार देत आली आहे. भाजपचे नगरसेवक आले तर त्यांना न्याय दिला जाईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. पालिकेत सध्या भाजप विरोधी पक्षही नाही व विरोधी नेतेपदही त्यांच्याकडे नाही. हे पद काँग्रेसकडे आहे. त्यामुळे भाजपने स्वप्नातून बाहेर पडावे, असा सल्लाही जाधव यांनी दिला. सध्या पालिकेत संख्याबळानुसार भाजप दोन नंबरचा पक्ष आहे. सन २०१७ च्या पालिका निवडणुकीत भाजपचे ८४, तर शिवसेनेचे ८६ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे भाजप हा दोन नंबरचा पक्ष असून त्या वेळी विरोधी पक्षनेतेपदी न राहता भाजपने पहारेकऱ्याची भूमिका बजावली. त्यामुळे हे पद तीन नंबरवर असलेल्या काँग्रेसकडे गेले. दिवाळीनंतर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...