आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भाजपचा सवाल:महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाच्या उधलपट्टीस नेमके काय कारण? 'महाजॉब्स पोर्टल'वरून भाजपचा शिवसेना-राष्ट्रवादीवर हल्लाबोल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भूमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून महाविकास आघाडी सरकारनं 'महाजॉब्स' हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले. दरम्यान या पोर्टलच्या आवश्यकतेवर भाजपकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्या खात्यामध्ये आधीपासूनच अशा स्वरूपाचं पोर्टल असताना वेगळे पोर्टल का?,' असा खोचक सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे.

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. टाळेबंदीनंतर राज्यात सध्या 65 हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरावाना देणे सुरू केले आहे. अशा  स्थितीत उद्योगांत कुशल, अर्थकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी करोना आजाराच्या संसर्गामुळे  कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची निश्चिती नाही, त्यामुळे  उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी महाजॉब्स हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. 

दरम्यान भाजपचे आमदार राम कदम यांनी या पोर्टलवरून महाविकास आघाडीतील मतभेदांवर टिप्पनी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नवाब मलिक यांच्या खात्याच्या अखत्यारीत 'महास्वयंम' या नावानं अनेक वर्षांपासून एक पोर्टल आहे. त्याचा उद्देशही रोजगार देणे हाच आहे. असे असतानाही कोट्यवधी रुपये खर्चून 'महाजॉब्स' का सुरू करण्यात आलं? हा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील समन्वयाचा अभाव आहे की आपसातील भांडण?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

यासोबतच '1/3 तरुणांना जॉब मिळाल्यावर दोन्ही पक्षांचा  श्रेय घेण्याचा प्रयत्न ? पोर्टल च्या निमित्तानं कुणाचे उखल पांढर करण्याचा प्रयत्न ?  महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाची उधलपट्टीस नेमके काय कारण ? आमच्या पोलिसांचा कापलेला पगार द्यायला पैसे नाहीत म्हणणाऱ्या सरकारने  याचे उत्तर द्यावे. असा सवालही कदम यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे. 

0