आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती हिंसाचार:राज्यात दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे कारस्थान, राज्यपाल राजवटीचा खेळ हाणून पाडू- संजय राऊत

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरा येथील हिंसात्मक घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यात नांदेड, नाशिक, अमरावती या जिल्ह्यात बंदला हिंसक वळण आल्याच्या घटना घडल्या. त्यापार्श्वभुमीवर आज अमरावतीत जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.

या बंदला देखील आता हिंसक वळण लागल्याची माहिती मिळत आहे. भाजपने आज संपूर्ण जिल्ह्यात बंदचे आवाहन केले असताना आज अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यात गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. जी दुकाने सुरू आहे त्याला बंद करा. अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. आंदोलक 'जय श्री राम' च्या घोषणा देत असून, त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या आहेत. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

राज्यात सुरू असलेल्या दंगलीवरून खासदार संजय राउत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "रजा अकादमीची एवढी ताकद नाही, चार टाळकी नाहीत त्यांच्याकडे, त्याच्यामागे वेगळेच लोक आहेत." अशी प्रतिक्रिया राउतांनी दिली आहे.

भाजप जातीय दंगली, धार्मिक दंगलीशिवाय राजकारण करूच शकत नाही, भाजपच्या माध्यमातून दंगली घडवल्या जात असतील तर गृह मंत्रालय सक्षम आहे, सरकार सक्षम आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे मोठे कारस्थान आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून सरकारला काय चरोट्या उठत नाही, आम्ही मनाने आणि कामाने खंबीर आहोत. आता दंगली घडवून अस्थिरता निर्माण करण्याचे यांचे कारस्थान सुरू आहे.

हे ठरवून झाले
मराठवाड्यात, औरंगाबादच्या काही भागात, अमरावतीत असे प्रकार झाले, हे ठरवून करण्यात आहे आहे. या राज्यातील विरोधी पक्षाने महाराष्ट्राला अशाप्रकारे चूर लावण्याचा प्रकार करू नये, महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला धक्का लावू नका. अमूक खाते कुणाकडे हे महत्त्वाचे नाही, महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ते महत्त्वाचे आहे. असे संजय राउत म्हणाले.

गृहमंत्र्यांचे आवाहन

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने संपुर्ण राज्यात आज आंदोलक केले. त्यात नांदेड, मालेगाव, अमरावती आणि अन्य काही शहरांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. मी सर्व हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांना शांततेत राहण्याचे आवाहन करतो. असे वळसे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर हल्ले केले जात आहेत. त्यानंतर त्रिपुरामध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. मुस्लिम समाजाने असे आरोप केले आहे की, आम्हाला धमकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या धार्मिक स्थळांची तोडफोड केल्याची घटना देखील जोराने पसरत आहे.

दरम्यान, त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारलेल्या बंददरम्यान नांदेड शहरासह मालेगावात तणाव निर्माण झाला होता. देगलूर नाका येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले, तर शिवाजीनगर भागात दुपारी अडीचच्या सुमारास 30 ते 40 जणांच्या जमावाने दुकानावर दगडफेक करत नासधूस केली.

बाफना नाका रस्त्यावर देशी दारूच्या दुकानासमोरील रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फोडण्यात आल्या. यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. काही काळ शहरात तणाव निर्माण झाला. प्रत्येक चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

बातम्या आणखी आहेत...