आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक:भाजपने 5 उमेदवार दिल्याने क्रॉस व्हाेटिंग होऊन काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता, 20 जूनला मतदान

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी अपेक्षेप्रमाणे भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे अतिरिक्त उमेदवार शिवाजीराव गर्जे यांनी माघार घेतली. त्यामुळे १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने घोडेबाजार होऊन क्रॉस व्हाेटिंग होण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसचे भाई जगताप यांना याचा फटका बसवण्याची शक्यता आहे. तसेच सेनेचे आमशा पाडवी आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे हे डेंजर झोनमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

एकूण आमदार 285 मतांचा कोटा : 27 10 जागांसाठी 11 अर्ज इतर : 29 मते = अपक्ष 13, छोटे पक्ष सदस्य 16 । अपात्र : 03 मते = 01 निधन, 02 आमदार तुरुंगात

भाजप : एकनाथ खडसे, आमशा पाडवींना पाडण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे व शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यापैकी एक उमेदवार पाडण्याचा प्रयत्न. अधिक मते घेऊन सरकार अल्पमतात असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न.

शिवसेना : राज्यसभेतील पराभवामुळे काँग्रेसशी असहकार
आपले दोन्ही उमेदवार सुरक्षित करण्यासाठी अपक्ष व छोट्या पक्षांच्या मदतीने ३० पर्यंतचा कोटा करणे. राज्यसभेचे उट्टे काढण्यासाठी काँग्रेसशी असहकार्याचे धाेरण आखल्याची चर्चा.

अपक्ष : मतदारसंघात निधी, महामंडळ मिळवण्यासाठी २९ आमदारांची रणनीती

- मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी सरकारकडून शब्द घेणे, निधी अधिक पदरात पाडून घेणे. - महामंडळ तसेच मिळालेच तर मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळवण्यासाठी दबाव. - मत देण्याच्या बदल्यात आगामी काळातही सत्ताधारी पक्षांकडून सर्व प्रकारची मदत मिळवण्याची अपेक्षा.

बातम्या आणखी आहेत...