आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप येणार, मुंबई घडवणार:भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी, कार्यकारिणी बैठकीत मुंबईत निर्धार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई महापालिकेत स्वबळावर सत्ता आणण्याचा भाजपचा निश्चय

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजप कार्यकरिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिका निवडणुकीसाठी भाजप येणार-मुंबई घडवणार हे घोषवाक्य पक्षाने जाहीर केले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्या दृष्टीने दादर पूर्व येथील वसंतस्मृती कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुंबई भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, आमदार उपस्थित होते.

या बैठकीत मुंबईतील संघटनात्मक बांधणी व निवडणुकीची रणनीती यावर चर्चा झाली. दरम्यान, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पालिका निवडणुकांवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या वेळी बोलताना दिली.

स्वबळावर सत्तेचा निश्चय

फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सहभागी होती. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असूनही सत्तेत सहभागी न होता, शिवसेनेला पाठिंबा दिला होता. सध्या शिवसेना राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर आहे. युती तुटल्याने २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मुंबई महापालिकेत स्वबळावर सत्ता आणण्याचा भाजपचा निश्चय आहे.

बातम्या आणखी आहेत...