आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यभरात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. दरम्यान या निकालावर भाजपने पत्रकारपरिषद घेत आपली प्रतिक्रिया मांडली. या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असा दावा केशव उपाध्ये यांनी केला. सत्ताधाऱ्यांनी साम-दाम-दंड-भेदचा वापर केला. 14 हजार पैकी 6 हजार गावात भाजप नंबर 1 वर असेल असेही उपाध्ये म्हणाले.
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल आज जाहीर होत आहेत. 6 हजार ग्रामपंचायतीत भाजपप्रणीत पॅनेलची सत्ता येईल. कोकण शिवसेनाचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले जाते, पण कोकणवासियांनी भाजपवर विश्वास दाखवला. सत्ताधाऱ्यांनी साम-दाम-दंड-भेदचा वापर केला पण ग्रामीण भागात राज्य सरकारबद्दल नाराजी आहे. असेही उपाध्ये म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.