आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर:हिंदुत्वाचे कातडे पांघरलेल्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला, केशव उपाध्येंची टीका

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गिरे तो भी टांग उपर. काही प्राणी वाघाचे कातडे पांघरतात. तसेच यांनी हिंदुत्वाचं कातडे पांघरले होते. आता ते कातडे फाटून त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे', अशा शब्दात केशव उपाध्याय यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

पुढे बोलताना केशव उपाध्याय म्हणाले की, सत्ता असताना जे घराबाहेरही पडले नाहीत ते आता महाराष्ट्र पिंजून काढायला निघाले आहेत. त्यांना जनतेच्या हितापेक्षा स्वतःच्या पक्षाची आणि कुटुंबाची काळजी आहे हेच यातून स्पष्ट होत आहे. केवळ हात उंचावून गर्जना केल्याच्या आवेशात फुकटचे सल्ले देणाऱ्या ठाकरेंचे हे रूप ओळखल्यामुळेच पक्षाच्या फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्याएवढा तुकडाही यांच्यासोबत राहिला नाही.

गिरे तो भी टांग उपर

पक्षात खदखदणाऱ्या असंतोषाला सामोरे जाण्याऐवजी पद सोडून पळ काढणारे ठाकरे यांची भाजपला अस्मान दाखविण्याची भाषा म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ असाच प्रकार आहे. असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. आधी फुटलेले तोंड सुधारा. जमिनीवरून धडपडत तरी नीट उभे राहा, आणि मग अस्मान दाखविण्याच्या वाफा सोडा.

पेंग्विनसेनेचे पळपुटे शिलेदार

मात्र, पाठीमागे कोणी आहे की नाही हे तपासून पाहायला विसरू नका. नाहीतर शिल्लक पेंग्विनसेनेचे पळपुटे शिलेदार तुम्हाला वाऱ्यावर सोडून पळून गेलेले असतील. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा अमलात आणण्याची हीच ती वेळ असल्याचा टोला त्यांनी लगावला.

मूठभर निष्ठावंत केव्हाही बरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेंवर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते, शिवसेनेच्या वाईटावर टपलेल्यांचा दसरा मेळाव्यात सगळा हिशोब चुकता करणार आहे. आता तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा संयमाचा मास्क नसेल. नासलेल्या लोकांपेक्षा मूठभर निष्ठावंत केव्हाही बरे. या मूठभरांच्या भरवशावर मैदान गाजवू, या शब्दात यांनी शिंदे गट आणि भाजपावर हल्लाबोल केला. मातोश्रीवर शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...