आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:पीक कर्ज, कर्जमाफी अंमलबजावणी मागणीसाठी भाजपचे आज राज्यव्यापी आंदोलन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'महाविकास आघाडी सरकारने ताबडतोब पीक कर्जाचे वाटप सुरू करावे'

पावसाळा सुरू होऊनही खरीप हंगामा साठीचे पीक कर्जवाटप ठप्प असून महाविकास आघाडी सरकारने ताबडतोब पीक कर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी भाजप सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली.

‘बांधावर खत आणि बियाणे’ या राज्य सरकारच्या योजनेचा बोजवारा उडालेला आहे. पीक कर्जाचे वाटप ठप्प झाले आहे. राज्य सरकारने प्रसंगी कर्ज उभारणी करावी, पण शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे तसेच कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी, अशी भाजपची मागणी आहे. पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात ठिकठिकाणी बँकांसमोर निदर्शने करतील. तसेच शेतकऱ्यांच्या सह्या गोळा करून त्यांचे निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात येईल. सध्या कोरोनाची साथ असल्यामुळे आंदोलनात योग्य काळजी घेतली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. मजबुरीने व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागत आहे. हरभरा खराब होण्याची वेळ आली तरी खरेदी होत नाही. त्यामुळे बियाणे, खते, मजुरी भागवायची कशी, हा मोठा प्रश्न असल्याचे पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...