आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

memes:यूपीतल्या विजयांन भाजप आणखी प्रबऴ; सोशल साईटवर मीम्स व कमेंट्सचा वर्षाव

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या सोशल मीडियाचा ट्रेंड

मुंबई : गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या चार ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या झालेल्या निदडणूकांमध्ये भाजप पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. तसेच उत्तर प्रदेशात भाजपला 273 जागा मिळाल्या असून तो सर्वाधीक उच्च पक्ष म्हणून ओळखला जात आहे. मात्र, समाजवादी पक्षाला 125 जागा, तर काँग्रेसला फक्त 2 जागांवर मत मिळाली आहेत. बहुजन समाजवादी या पक्षाने 1 जागा आणि इतर पक्षाने 2 जागा जिंकल्याचं काल झालेल्या निवडणुकीच्या अहवालातून समोर आले आहे. गोव्यात मात्र 40 विधानसभेच्या जागांपैकी भाजपला 20, काँग्रेसला 12, आणि अपक्षांसह इतर प्रादेशिक पक्षांना 8 जागा मिळाल्या आहेत. पंजाबमध्ये ‘आप’ ला 92 जागांवर घवघवीत यश मिळाले आहे. काँग्रेस पक्षाला पंजाबमध्ये सत्ता असूनही फक्त केवळ 18 जागांवर समाधान मानावे लागले आहे. बाकी, इतर प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष यांनी 7 जागा जिंकता असून, उत्तराखंडमध्ये देखील 70 जागांपैकी सर्वाधिक 47 जागा एकट्या भाजपच्या आहेत. दरम्यान, मणिपूरमध्ये भाजपनं 32 जागा जिंकल्या आहेत. मात्र, एनपीपी या पक्षाने 7, तर काँग्रेस पक्षाने, आणि इतर प्रादेशिक पक्षाने केवळ 16 जागा जिंकल्या आहेत.

निवडणूक निकालानंतर राजकीय नेत्यांवर सूरू आहे मिम्सचा वर्षाव
गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या चारही राज्यांमध्ये भाजपला मोठं यश मिळाले आहे. दरम्यान, झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर फेसबूक, ईनस्टाग्राम, ट्विटर या सारख्या सोशल साईटवर मीम्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अभिनेता अक्षय कुमार यांच्या फोटोंचा वापर करून हे सगळे मिम्स बनवले जात आहे.

सपा, काँग्रेसवर देखील नेटकऱ्यांनी टाकल्या मीम्स
भाजपने यूपीत पून्हा एकदा दूसरी सत्ता स्थापन केली आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसनं आश्वासनांचा पाऊस पाडून लोकांना प्रोत्साहित केलं, मात्र हि सगळी आश्वासनं वाया गेली. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मतदारांना विश्वास देऊनही त्यांना पराजयाचा सामना करावा लागला. ह्याच मुद्दाला पकडून नेटकऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते अखिलेश यादव या दोघांवर गंमतीशिर मीम्स बनवले.

शिवसेनेला देखील नेटकऱ्यांनी दिला टोला
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत आघाडीवर होते. त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची साथ होती. भाजपला रोखण्याचा प्रयत्न पुरता फसल्याचे दिसून आले आहे . आता नेटकऱ्यांनी देखील संजय राऊत यांना ट्रोल करून त्यांच्यावर पण मीम्स बनवले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...