आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला बाप्पांच्या अशाच एका भक्ताची ओळख करून देणार आहोत, जो गेली 20 वर्षे सतत डोळे बांधून बाप्पांची मुर्ती उभारत आहे. आपल्या अनोख्या प्रयत्नांमुळे गिनीज बुकमध्ये नामांकित झालेल्या मुंबईच्या रमा शाह यांचे नाव यंदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आले आहे. सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन त्यांनी ही माहिती शेअर केली आहे. रमा शहा यांनी आतापर्यंत तीन लाखाहून अधिक गणेशमूर्ती बनवल्या आहेत.
3 मिनिटांत सर्वात छोटी गणेश मूर्ती बनविण्याची नोंद
मूर्तिकलेत आपले कलागुण प्रदर्शित करणाऱ्या रमा यांनी अवघ्या तीन मिनिटांत गणेशची सर्वात छोटी मूर्ती बनवण्याचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड बनवला होता. या अनोख्या पराक्रमामुळे त्या अमेरिकेतील प्रसिद्ध शो 'रिप्ले बिलीव्ह इट नॉट' या पॅनेलमध्येही दिसल्या आहेत. केवळ 99 दिवसात डोळ्यावर पट्टी बांधून गणपतीच्या 9,999 मूर्ती बनवल्यामुळे त्या शोमध्ये दिसल्या होत्या. एका ठिकाणी त्यांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या 18 हजाराहून अधिक प्रकारच्या गणेशमूर्तींचे प्रदर्शन करून आपले नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये नोंदवले होते.
आवड म्हणून बनवतात मूर्ती
रमा या एक गृहिणी आहेत आणि मुलांना आर्ट अँड क्राफ्टची ट्रनिंग देतात. त्या नियमित मूर्ती बनवत नाहीत. रमा मानतात की, देवाने प्रत्येक व्यक्तीला काही तरी चांगले करण्यासाठी या जगात पाठवले आहे. गेल्या 20 वर्षांपासून आतापर्यंत त्यांनी प्रत्येक साइजच्या जवळपास 4 लाख 25 हजारांपेक्षा जास्त प्रतिमा बनवल्या आहेत. यामधील एक हजारांपेक्षा जास्त मूर्ती त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून बनवल्या आहेत.
नरेंद्र मोदींनाही गिफ्ट केली आहे मूर्ती
रमा यांनी 2004 मध्ये गुजरातच्या भावनगरमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून एक गणपतीची मूर्ती बनली होती. ही त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना गिफ्ट केली होती. रमा यांच्या यशात त्यांचे कुटुंब आणि पतीचे मोठे योगदान आहे. त्यांचे तीन मुलं त्यांना या कामात खूप साथ देतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.