आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रक्तदानासाठी शिवसैनिकाची ऑफर:रक्तदात्यास मिळेल चिकन आणि पनीर; शिवसैनिकाच्या ऑफरची सोशल मीडियावर चर्चा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताची टंचाई असल्याचे सांगत जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे अनेक नेते मंडळींकडून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. नागरिकांना निरनिराळ्या भेटवस्तू देऊन रक्तदानासाठी प्रोत्साहन देण्याचे काम ते करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रभादेवीमध्ये रक्तदान करणाऱ्या मांसाहारींना एक किलो कोंबडी, तर शाकाहारी व्यक्तींना पनीर देण्यात येणार असल्याची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या जाहिरातीची जोरदार चर्चा सुरू आहे.

13 डिसेंबर रोजी माहीम-वरळी विधानसभा क्षेत्रात शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी मैदानात हे रक्तदान शिबीर पार पडणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser