आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शौर्याची कहाणी:महिला वनअधिकाऱ्याच्या शरीरातून वाहत होते रक्त, तरीही हिम्मत सोडली नाही; तीन फॉरेस्ट ऑफिसर्सनी अशाप्रकारे बिबट्याला पकडले

रत्नागिरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रत्नागिरीतील घटना, रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रियंका आणि साथीदारांनी मिळून बिबट्याचा हल्ला रोखला
  • घटनास्थळी फॉरेस्ट ऑफिसर बिबट्याला पकडण्याची योजना आखत होते, अचानक बिबट्याने केला हल्ला
Advertisement
Advertisement

रत्नागिरीत तैनात रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) प्रियंका लागड शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता ऑफिसमध्ये बसलेल्या होत्या. तेवढ्यात बावनदी गावाच्या एका वाडीजवळ बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्याचा त्यांना फोन आला. माहिती मिळताच प्रियंका, रेंज फॉरेस्ट ऑफिसर राजेंद्र पाटील आणि आपल्या पथकासह 15 मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत बिबट्या महिलेच्या चेहऱ्याला जखमी करून गायब झाला होता. प्रियंका आणि राजेंद्र घटनास्थळी बिबट्याला पकडण्याची योजना आखत होते. तेवढ्यात झाडावर बसलेल्या बिबट्याने प्रियंकावर झडप घातली.  

'बिबट्याने माझी मांडी पकडली'

प्रियंकाने सांगितले की, "घटनास्थळी उपस्थित काही ग्रामस्थ आम्हाला बिबट्याच्या हल्ल्याची माहिती देत होते. त्याला पकडण्यासाठी मी माझ्या पथकासोबत चर्चा करत होते, तेवढ्यात अचानक बिबट्याने माझ्यावर झेप घेतली आणि माझी मांडी पकडली. तेथे उपस्थित लोकांनी बिबट्याला पकडून माझ्यापासून दूर केले. यानंतर बिबट्याने राजेंद्रकडे आपला मोर्चा वळवला, परंतु त्यांनी स्फुर्ती दाखवत त्याचा जबडा पकडला."

प्रियंका लगड (डावीकडे), आरएफओ राजेंद्र पाटील (मध्यभागी) आणि वनरक्षक कडूकर (उजवीकडे) यांनी बिबट्याला पकडले.

जखमी असूनही मी तेथून हटले नाही

"जखमी झाल्यानंतरही मी तेथून हटले नाही. माझ्या पायातून रक्त वाहत होते आणि मी बिबट्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले. यानंतर फॉरेस्ट गार्ड कडुकर देखील आमच्या मदतीसाठी पुढे आला. राजेंद्र पाटीलने बिबट्याचे तोंड पकडले होते. त्यादरम्यान तो थोडा अशक्त झाला आणि आम्ही तिघांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पिंजऱ्यात बंद केले."

मी घाबरले नाही आणि मला भीती देखील वाटली नाही

"बिबट्याने हल्ला केल्यानंतर मी घाबरले नाही आणि मला भीती देखील वाटली नाही. माझ्यासमोर बिबट्या होता आणि माझे दोन्ही साथीदार त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. वेदना होत असूनही मी धैर्य दाखवत त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले. काही सेकंदात हा सर्व प्रकार घडला. मला समजण्यास वेळच मिळाला नाही. त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त बिबट्याला पकडण्याचा विचार होता."

हृदयविकारामुळे बिबट्याचा वाटेत मृत्यू

"बऱ्यात प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात आम्हाला यश आले. यात काही ग्रामस्थांनी आमची मदत केली. बिबट्याला गावातून फॉरेस्ट ऑफिसमध्ये घेऊन जाताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम अहवालात हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. आम्ही त्याला वाचवू शकलो नाही याचे वाईट वाटते. बिबट्याला पकडताना आम्ही तिघेजण जखमी झालो. सध्या आम्ही ठीक आहोत."

सोशल मीडियावर शेअर केली जात आहे शौर्याची कहाणी 

बिबट्याला पकडण्याची ही कहाणी सोशल मीडियावरही शेअर केली जात आहे. आयएफएस @rao_muvvala यांनी लिहिले...

Advertisement
0