आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेकडे मोर्चा:मुंबई पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षाच्या घरावर आयटीचा छापा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिकेतील शिवसेना नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी भायखळ्यातील शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्या घरी शुक्रवारी (ता.२५) पहाटे आयकर विभागाने छापे मारले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचे टार्गेट शिवसेना असल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छापेमारी झाल्याने याला राजकीय रंग चढला आहे. माझगावमधील त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून सकाळपासून तपास सुरू होती.

कोण आहेत जाधव?
यशवंत जाधव हे १९९७ आणि २००७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. २००८ साली बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षपदी त्यांच्यी निवड झाली. २०११ नंतर ते शिवसेनेचे उपनेते बनले. २०१७ मध्ये महानगरपालिकेत सभागृह नेते म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २०१८ मध्ये स्थायी समिती अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदार संघातून शिवसेनेच्या आमदार आहेत.

सोमय्यांनी काय आरोप केले?
१. जाधव परिवाराचे प्रधान डिलर्स प्रा. लिमिटेड या बोगस कंपनीसोबत आर्थिक व्यवहार आहेत. ही कंपनी शेल कंपनी आहे. मिळकत, जमीन, संपत्ती लपवण्याचा जाधव कुटुंबीयांनी प्रयत्न केला आहे.
2. स्कायलिंक कमर्शियल लिमिटेड आणि सुपरसॉफ्ट सप्लायर्स लि. अशा ८ शेल कंपन्यासोबत जाधव कुटुंबीयांनी १६ कोटींचे मनी लॉड्रिंगचे व्यवहार झाले आहेत.

किरीट सोमय्या यांचा नवा दावा : उद्धव ठाकरे आणि गांधी परिवाराचा एकच हवाला ऑपरेटर
भाजप नेते किरीट सोमय्या शुक्रवारी म्हणाले, यशवंत जाधव यांनी प्रधान डेव्हलपर्स नावाच्या शेल कंपनीद्वारे १५ कोटी रुपये मिळवले. यशवंत जाधव यांनीच उद्धव ठाकरे व सोनिया गांधी यांच्या परिवाराचे संबंध घोषित केले.

1 उद्धव ठाकरे आणि गांधी परिवार यांचा उदयशंकर महावार हा एकच हवाला ऑपरेटरही आहे. तो सोनिया गांधी आणि परिवाराचे मनी लाँड्रिंग करतो. त्याचा परिचयही सोनियांनीच उद्धव यांना करून दिला आहे.

2 शेल कंपनीला पैसे देऊन यशवंत जाधव व परिवाराने चेक घेतले. त्यावर तीन कंपन्या तयार केल्या होत्या. मुंबई पालिकेचे चार इंजिनिअर आणि काही नेते आयकर विभागाच्या रडारवर असल्याचा दावा सोमय्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...