आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा 28 डिसेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार होती, परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन या सभेला मान्यता दिलेली नाही. बीएमसीच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस नेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हे प्रकरण यासाठी देखील महत्त्वपूर्ण होते की, BMC मध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसेना एकत्र सत्तेत आहेत.
राज्यातील सत्तेत काँग्रेसचा देखील समावेश आहे. असे असताना देखील राहुल गांधींच्या रॅलीला अडचणी येत आहेत. अशा वेळी आपल्या सहयोगी पक्षाविरोधात कोर्टात जाण्याचा हा निर्णय दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा वाद निर्माण करु शकतो. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयात उद्या या प्रकरणाची सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दाखल केलेल्या या याचिकेत राज्य सरकार, मुंबई पोलिस आयुक्त, बीएमसी, बीएमसी आयुक्तांना पक्षकार करण्यात आले आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवाजी पार्कमध्ये सर्व राजकीय मेळावे आणि सभांना बंदी घालण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. येथे केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच आयोजित करता येऊ शकतात. तेही वर्षात फक्त 3-4 दिवस. याचिकेत शिवाजी पार्कवर सभा आयोजित करण्याची परवानगी मागितली आहे.
राहुल यांच्या दौऱ्यावर ओवैसींनी उपस्थित केला होता सवाल
या दौऱ्यावरन रविवारी AIMIM चीफ असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रश्न उपस्थित केला होता. त्यांची रॅली रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या निर्णयाविरोधात ओवैसी यांनी म्हटले होते की, ओमायक्रॉनचा धोका आज आहे आणि जेव्हा राहुल गांधी येतील तेव्हा तो धोका टळणार आहे का? जर ओमायक्रॉनचा धोका टळला नाही तर राहुल गांधींच्या सभेवेळी कलम 144 लागू केली जाऊ नये?
याचे उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते की, 'कलम 144 चा निर्णय मुंबई पोलिस कमिश्नरचा होता. 28 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी आम्ही अद्याप कोणताही पुढाकार घेतलेला नाही, तसेच कोणताही निर्णय देखील घेतलेला नाही'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.