आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट लसीकरण प्रकरण:BMC ने प्रायव्हेट सोसायटीजमध्ये लसीकरणासाठी जारी केल्या गाइडलाइन्स, 2 हजार लोकांना मुंबईमध्ये देण्यात आली आहे बनावट लस

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरणासाठी बनवण्यात आले नवीन नियम

मुंबई आणि आसपासच्या सुमारे 2 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची बनावट लस देण्यात आल्यानंतर बीएमसी झोपेतून जागी झाली आहे. शनिवारी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेने लसीकरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत आता खासगी लसीकरण केंद्राने सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्यापूर्वी प्रभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक केले आहे.

कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीच्या बनावट लसीकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुंबईतल्या खार, बोरिवली, वर्सोवा, परळ आणि ठाण्याच्या शेजारच्या जिल्ह्यातही बनावट लसीकरण केल्याच्या घटना घडल्या आहेत. सरकारने मुंबई हायकोर्टाला सांगितले आहे की 2054 जणांना बनावट लसीचा डोस मिळाला आहे. महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी बनावट लसीकरण झाले, त्या ठिकाणी सोसायट्यांनी आधी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही.

लसीकरणासाठी बनवण्यात आले नवीन नियम
सोसायटीच्या आवारात खासगी लसीकरण केंद्रांमार्फत लसीकरण मोहीम राबवण्यापूर्वी प्रभाग स्तरावर बीएमसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक असेल.
लसीकरण केंद्रांवरही हेच नियम लागू असतील. गोमारे म्हणाले की, सर्व लसीकरण केंद्रांना विशेष नोंदणीकृत क्रमांक देण्यात आले आहेत.

लसीकरणाच्या अग्रिम सूचनेमुळे हा फायदा होईल की, नोंदणीकृत क्रमांक वैद्यकीय अधिकारी तपासू शकतात.

ठाण्यात बनावट लसीकरण, पाच जणांवर गुन्हा दाखल
मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही बनावट लसीकरणाचे प्रकरण समोर आले आहे. नौपाडा पोलिसांनी 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्या पाच जणांविरूद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे, ते मुंबई पोलिसांनी पकडलेल्या टोळीशी संबंधित आहेत. यामध्ये महेंद्रसिंग, श्रीकांत माने, संजय गुप्ता, सीमा आहूजा आणि करीम यांचा समावेश आहे.

ठाण्यात नितीन कंपनीजवळील श्रीजी आर्केड इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर असलेल्या रेणुबुई डॉट कॉम कार्यालयात 26 मे रोजी लसीकरण करण्यात आले आणि कार्यालयात कार्यरत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ही लस दिली गेली. कोविशील्ड लसीच्या नावावर प्रत्येकाला बनावट लस दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...