आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएमसीची कारवाई:नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाईसाठी महापालिकेच्या हालचालींना वेग, 8 अधिकारी करणार तपासणी

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील आदिश बंगल्याबाबत कारवाई करण्याबाबत मुंबई महापालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. आज मुंबई पालिका अधिकारी नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करणार आहेत. 8 अधिकारी सांताक्रुज पोलिस स्टेशन येथे आले असल्याची माहिती आहे. पोलिस संरक्षण घेऊन मग ते जुहूकडे जाणार आहेत. नारायण राणे हे स्वत: बंगल्यात उपस्थित असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे.

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील आदिश बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर बंगल्याची तपासणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली. अंधेरी जुहू येथील तारा रोडवर उभारण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. मागच्या आठड्यात नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. तसेच, बंगल्याची आवश्यक ती कागदपत्र तुम्ही तयार ठेवा, असे राणेंना सांगण्यात आले होते.

मुंबईतील जुहूतील आदिश बंगल्या संदर्भात माहिती देण्यासाठी स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि निलेश राणे बंगल्यावर आहेत. ते संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतील अशी माहिती मिळाली आहे. तसेच बीएमसी कर्मचारी आले तर त्यांना नेमकी काय शंका याचे निरसन केले जाईल आणि जी काही कागदपत्रे असतील ती देणार असल्याची माहिती राणे कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...