आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BMCचा निर्णय:मुंबईत अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच मॉलमध्ये मिळणार एंट्री, येथे एका दिवसात सापडले 3,000 नवीन रुग्ण

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 25,833 नवे रुग्ण आढळले.

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंता वाढवणारी आहे. येथे गुरुवारी 25,833 नवीन संक्रमित आढळले. देशात कोरोना महामारी आल्यापासून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. एका दिवसातच एवढे रुग्ण कोणत्याही राज्यामध्ये सापडलेले नाहीत. मुंबईत एका दिवसात 3,000 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबईमध्ये आता मॉलमध्ये एंट्री करण्यापूर्वी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल किंवा गेटवर रॅपिड अँटीजन टेस्ट करुन घेतली जाईल. याच्या व्यवस्थेसाठी BMC ने सर्व मॉल व्यवस्थापनाला 22 मार्चपर्यंत मुदत दिली आहे.

कोरोनाचे वाढते प्रकरणे पाहता ‌BMC (बृहन्मुम्बई म्युनिसिपल कॉरपोरेशन) ने मुंबईच्या सर्वच गर्दीच्या ठिकाणी अँटीजन टेस्ट करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 11 सप्टेंबरला 24,886 कोरोना संक्रमित आढळले होते. तेव्हापासून हा आकडा टॉपवर होता.

महाराष्ट्रात 25,833 नवे रुग्ण

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 25,833 नवे रुग्ण आढळले. हा आकडा देशाच्या एकूण नव्या रुग्णांच्या 63.21% इतका आहे.राज्यात आतापर्यंत 23.96 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 21.75 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर 53,138 संक्रमितांनी जीव गमावला आहे. सध्या 1.66 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...