आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BMC ची कारवाई:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वांद्र्यातील 5 पबमध्ये छापेमारी, ग्राहकांना मास्क घालण्याच्या सूचना देऊन सोडले

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पब कर्मचाऱ्यांवर महामारी कायद्यांतर्गत खटला दाखल

राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर बृहनमुंबई महापालिकेची धडक कारवाई सुरू आहे. शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे परिसरातील 5 पबवर BMC च्या आधिकाऱ्यांनी छापेमारी केली, यावेळी अनेकांनी मास्क आणि सोशल डिस्टिसिंग सारख्या नियमांचे पालन केलेले दिसले नाही. यानंतर आधिकाऱ्यांनी सर्वांना मास्क घालण्यासह इतर नियमांचे पालन करण्याचा इशारा देऊन सोडून दिले.

पब कर्मचाऱ्यांवर महामारी कायद्यांतर्गत खटला दाखल

कारवाईदरम्यान BMC आधिकाऱ्यांनी पबच्या कर्मचाऱ्यांवर 188 पँडेमिक कायद्यांतर्गत वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसच, BMC च्या आधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील आदेश येईपर्यंत अशाप्रकारची कारवाई सुरुच राहील.

कोरोना रुग्णांची संख्या वाढली

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत परत एकदा वाढ होताना दिसत आहे. यामुळे राज्यावर पुन्हा एकदा लॉकडाउन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय, दोन ऑफिस स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले क्वारंटाइन झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 20 लाख 87 हजार 632 जणांना कोरोनाची लागण झाली असून, यातील 19 लाख 89 हजार 963 लोक ठीक झाले आहेत. तसेच, 51 हजार 713 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 44 हजार 765 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...