आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMC चा अर्थसंकल्प:जानेवारीपर्यंत 30,851.18 कोटींचा महसूल झाला प्राप्त, मालमत्ता करातून 16.14 लाख लोकांना मिळाला दिलासा

लेखक: विनोद यादव4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी बुधवारी स्थायी समितीत सन 2022-23 या वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प सादर केला. - Divya Marathi
मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी बुधवारी स्थायी समितीत सन 2022-23 या वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प सादर केला.

मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी बुधवारी स्थायी समितीत सन 2022-23 या वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प सादर केला. यंदा 45949.21 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत 17.70 टक्के अधिक आहे. कारण 2021-22 या वर्षासाठी अंदाजपत्रकाचा आकार सुमारे 39,038.83 कोटी रुपये होता. एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या अंदाजे एकूण अंदाजपत्रकापैकी 21 टक्के महसूल खर्च आणि 49 टक्के भांडवली खर्च असणार आहे.

जानेवारीपर्यंत 30,851.18 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त
महापालिका आयुक्त चहल यांच्या मते, 2022-23 मध्ये विविध स्त्रोतांकडून 30,743.61 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. हा 2021-22 च्या तुलनेत 2,932.04 कोटी रुपये अधिक आहे. 2021-22 मध्ये अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 27,811.57 कोटी रुपये महसूल मिळण्याचा अंदाज होता. हा अंदाज नंतर 37,538.41 कोटी रुपये करण्यात आला. जानेवारी 2022 अखेर मुंबई महापालिकेला 30,851.18 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

त्याचप्रमाणे, 2022-23 मध्ये 23,294.05 कोटी रुपयांच्या महसुली खर्चाचा अंदाज आहे. 2021-22 मध्ये महसुली खर्च 20,276.33 कोटी रुपये असल्याचा अंदाज होता, जो नंतर वाढून 22,744.87 कोटी रुपये झाला.

BMC कमिशनर इक्बाल सिंग चहल हे बजेट सादर करण्यासाठी जात असताना.
BMC कमिशनर इक्बाल सिंग चहल हे बजेट सादर करण्यासाठी जात असताना.

कोठून येणार किती कोटींचा महसूल?
मुंबई महापालिकेच्या अंदाजपत्रकानुसार, जकातीच्या बदल्यात अनुदान म्हणून 11,429.73 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. मालमत्ता करातून 7,000 कोटी, विकास नियोजन विभागाकडून 3,950 कोटी रुपये, महापालिकेने केलेल्या गुंतवणुकीवरील व्याजातून 1,128.74 कोटी रुपये आणि पाणी आणि सीवरेज​​शुल्कातून 1,596.93 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.

मालमत्ता करातून 16.14 लाख लोकांना दिलासा
महापालिका आयुक्त चहल यांच्या मते, 500 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या एकूण 16.14 लाख सदनिकाधारकांना मालमत्ता करातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. जनतेला दिलेल्या या दिलासामुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे 462 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

मुंबई पालिका कोणत्या प्रकल्पावर किती खर्च करणार?

 • मुंबई कोस्टल रोडवर 3200 कोटी रुपये
 • गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) वर 1300 कोटी रपये
 • घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर (कचरा ते उर्जेसह) 167.87 कोटी रुपये
 • मुंबई सीवरेज विल्हेवाट प्रकल्पासाठी 1340 कोटी रुपये
 • पिंजाळ प्रकल्पावर 30 लाख
 • पाणीपुरवठा बोगद्यासाठी 467 कोटी रुपये
 • सायकल तंत्रज्ञान प्रकल्पावर 45 कोटी
 • मिठी नदी प्रकल्पासाठी 565.36 कोटी रुपये
 • भगवती हॉस्पिटलवर 250 कोटी, एम.टी. अग्रवाल हॉस्पिटलवर 300 कोटी, आर.एन. कूपर हॉस्पिटलवर 116 कोटी आणि गोवंडीच्या पंडित मदन मोहन मालवीय हॉस्पिटलवर 175 कोटी रुपये
 • टाटा कंपाउंड वसतिगृहाच्या इमारतीच्या बांधकामावर 4 कोटी रुपये
बातम्या आणखी आहेत...