आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांना हटवून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना अध्यक्ष करा, ही मागणी मी सातत्याने लावून धरल्यामुळेच माझी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील नियुक्ती रद्द करण्यात आली, असा आरोप मंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
पाटील यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. या वेळी ते म्हणाले की, माझी २०१८ मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ९ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती बसली आणि त्यानंतर मात्र मी माझी भूमिका बदलत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांवर टीका करण्यास सुरुवात केली. कदाचित हीच बाब त्यांना आवडली नसावी आणि त्यामुळेच अचानक महामंडळातील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, पाटील यांची महामंडळावरून उचलबांगडी केल्याने माथाडी कामगारांनी बुधवारी वाशी कृउबामधील व्यवहार बंद पाडले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.