आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बोट क्लबचा  प्रशिक्षणार्थी सराव करताना बुडाला

सायखेडा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायखेडा महाविद्यालयातील बोटिंग क्लबचा प्रशिक्षणार्थी रवींद्र बाळकृष्ण भोईर (२०) हा विद्यार्थी सोमवारी (७ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता गोदावरी नदीपात्रात सराव करत असताना अचानक बोटीचा तोल जाऊन बुडाला.

सायखेडा महाविद्यालयाचे २५ ते ३० विद्यार्थी सोमवारी (७ नोव्हेंबर) बोट सरावासाठी उपस्थित होते. रवींद्र व इतर विद्यार्थी सराव करत असताना रवींद्र भोईर आपली बोट घेऊन दूरवर गेला. त्याच वेळी अचानक बोट उलटून तो नदीपात्रात पडला. त्याने मदतीसाठी जोरात आरोळीही ठोकली. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील सराव करणारे विद्यार्थी व प्रशिक्षक सुनहल धोंडगे त्याला वाचवण्यासाठी तातडीने त्याच्या दिशेने गेले. मात्र तोपर्यंत खोल नदीपात्रात तो दिसेनासा झाला होता. घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक पी.वाय कादरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. सकाळपासून आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल गडाख, बाळू आंबेकर, अजय चारोस्कर, सोमनाथ कोटमे, मधुकर आवारे, संतोष लगड आदी शोधकार्य मोहिमेत सहभागी झाले. पोलिस निरीक्षक कादरी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. परंतु सोमवारी रात्री उशिरापर्यंत रवींद्रचा मृतदेह सापडला नव्हता. रवींद्र भोईर हा चाटोरी येथील रहिवासी आहे. सायखेडा महाविद्यालयात तो एफवाय बीए वर्गात शिकत होता. सायखेडा महाविद्यालयातील बोट क्लब नाशिक जिल्ह्यात नावाजलेला आहे. एका प्रशिक्षणार्थी बुडाल्याची घटना घडल्याने गोदाकाठ परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...