आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना योद्ध्यांचा सन्मान:एक हजाराहून अधिक पोलिसांना संसर्ग, बॉलिवूड कलाकारांनी या फ्रंटलाइन वॉरियर्सच्या सन्मानार्थ सोशल मीडिया डीपी बदलला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षय कुमारने लिहिले- महाराष्ट्र पोलिस एक नायक आहे, आपला थकवा आणि भीती विसरून काम करत आहे

महाराष्ट्रातील पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग सतत वाढत आहे. गेल्या 24 तासांत 221 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1007 वर पोहचली आहे. यामध्ये 106 अधिकारी आणि 901 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय कोरोनामुळे 7 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये 4 मुंबईतील पोलिस आहेत. 

पोलिसांच्या सन्मानार्थ बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडिया डीपी बदलला

पोलिसांमध्ये कोरोना वाढता संसर्ग असताना देखील कर्मचारी रस्त्यावर आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अशा अग्रगण्य योद्ध्यांच्या सन्मानार्थ बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा डीपी (डिस्प्ले पिक्चर) बदलला आहे आणि त्याऐवजी मुंबई पोलिसांचा लोगो लावला आहे. यामध्ये सलमान खान, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, कॅटरिना कॅफ, रितेश देशमुख यांसारख्या बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. 

महाराष्ट्र पोलिस आपला थकवा आणि भीती विसरून काम करत आहे - अक्षय कुमार 

अक्षय कुमारने ट्विटरवर लिहिले की, 'मी दररोज फ्रंटलाइन वर्कर्सच्या शौर्याविषयी ऐकत आहे, जे आपला थकवा आणि भीती विसरून आम्हाला प्राधान्य देत आहेत. अशा नायकांपैकी एक महाराष्ट्र पोलिस देखील आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी माझे प्रोफाइल चित्र बदलत आहे. आपणही सामील होऊ शकता आणि त्यांना मनापासून सॅल्यूट करू शकता.'

अभिनेता अक्षयकुमारने आपला डीपी बदलला आणि मुंबई पोलिसांसाठी ट्विट केले.
अभिनेता अक्षयकुमारने आपला डीपी बदलला आणि मुंबई पोलिसांसाठी ट्विट केले.

अभिनेता अजय देवगणचे ट्वीट 

अभिनेता सलमान खान याचे ट्विटर पेज
अभिनेता सलमान खान याचे ट्विटर पेज

अभिनेता रितेश देशमुखचे ट्विट 

अभिनेता शाहरुख खान याचे ट्विटर पेज.
अभिनेता शाहरुख खान याचे ट्विटर पेज.
टायगर श्रॉफने हा फोटो आपल्या ट्विटर पेजवर शेअर केला आहे.
टायगर श्रॉफने हा फोटो आपल्या ट्विटर पेजवर शेअर केला आहे.
अभिनेत्री कतरिना कॅफचे ट्विटर पेज.
अभिनेत्री कतरिना कॅफचे ट्विटर पेज.
बातम्या आणखी आहेत...