आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये कोरोना:बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाइन होण्याचा घेतला निर्णय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी सकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांने घरीच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर त्याने स्वतः याविषयी माहिती दिली आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर लिहिले की, 'तुम्हा सर्वांना माहिती द्यायची आहे की, आज सकाळी माझा कोविड -19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करत मी स्वतःला आयसोलेट केले आहे. मी गरातच क्वारंटाइन आहे आणि आवश्यक त्या औषधी घेत आहे. मी सर्वांना अवाहन करतो की, माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी. मी लवकरच अॅक्शनमध्ये परत येईल.'

दरम्यान देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बॉलिवूडलाही कोरोनाने विळखा घातला आहे. काही दिवसांपूर्वी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर अभिनेत्री आलिया भटला देखील कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आता अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.

बातम्या आणखी आहेत...