आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई:मुंबईत 50 लाख रुपयांच्या चरससह संगीत दिग्दर्शकाच्या मुलाला अटक, एका यूट्यूब चॅनेलचा मालकही आरोपी

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूड कलाकारांना ड्रग्स पुरवल्याचा संशय

मुंबईतील ड्रग्स प्रकरणात दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट येत आहे. मुंबई पोलिस या प्रकरणात दररोज अनेक लोकांना बेड्या घालत आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात एक मोठी कारवाई करत का यूट्यूब चॅनेलच्या संचालकाला अटक केली.

दरम्यान, आरोपींकडून यावेळी 1 किलो चरस जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत 50 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई शहर ड्रग्स मुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बॉलिवूड कलाकारांना ड्रग्स पुरवल्याचा संशय
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख दत्ता नलावडे यांनी सांगितले की, एएनसीने गौतम दत्ताला (43) उपनगर अंधेरी (पश्चिम) येथून अटक केली. तो जुहू-वर्सोवा लिंक रोड परिसरातील रहिवासी असून यूट्यूब चॅनेलचा संचालक आहे. त्याचे वडील संगीत दिग्दर्शक आहेत. तो बॉलिवूडशी चांगला जोडलेला असल्याने चित्रपट कलाकारांना चरस पुरवल्याचा संशय असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही धागेदोरे आढळतात का? यासाठी मुंबई कसून चौकशी करत आहेत.

संशयास्पद ठिकाणी फिरताना आढळला आरोपी
नलावडे यांच्यानुसार, एएनसीचे वांद्रे युनिट पश्चिम उपनगरात गस्त घालत होते. या दरम्यान, एएनसीला अंधेरी पश्चिमेतील जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील राजश्री इमारतीजवळ एक संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळला. यावेळी त्या तरुणाजवळ लाल पिशवी होती, या बॅगमध्ये काय आहे हे शोधण्यासाठी पोलिसांनी त्याला अटक केली असे एएनसी युनिटचे पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...