आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई पोलिसांसाठी दिलासा:शूटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वॅनिटी व्हॅनचा मुंबई पोलिस करणार वापर, यामध्ये टॉयलेट, डायनिंग आणि झोपण्याची व्यवस्था

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईच्या या भागात तैनात आहेत व्हॅनिटी व्हॅन्स

संक्रमणाच्या वाढत्या धोक्यादरम्यान मुंबईमध्ये पोलिसांची टीम रस्त्यांवर उतरले आहे. ते कडक उन्हात सतत 12 ते 14 तास कर्तव्यावर असतात. रस्त्यावर तैनात असताना त्यांना शौचालय वापरणे, खाणे, पिणे आणि कपडे बदलण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, मुंबईच्या पोलिसांना आता चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वापरण्यात येणारी वॅनिटी व्हॅन वापरता येणार आहे.

शूटिंग दरम्यान बॉलिवूडमधील बड्या सिनेमातील स्टार्सना भाड्याने वॅनिटी व्हॅन पुरवणाऱ्या केतन रावल यांनी या मिनी लॉकडाऊनमध्ये नाकाबंदी दरम्यान दिवस-रात्र मुंबईच्या रस्त्यांवर पहारा देणाऱ्या पोलिसांसाठी मदतीचा हात पुढे केला.

मुंबईच्या या भागात तैनात आहेत वॅनिटी व्हॅन्स
केतन यांनी आतापर्यंत विविध नाकाबंदीच्या ठिकाणी मुंबई पोलिसांना एकूण 4 वॅनिटी व्हॅन विनामूल्य उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्यात दहिसर चेकनाका, दिंडोशी पोलिस स्टेशनच्या हद्दीत हायवेवर आणि घाटकोपरव्यतिरिक्त मरोल नाक्याजवळ तैनात केल्या आहेत.

या वॅनिटी व्हॅनमध्ये काय आहे

  • प्रत्येक वॅनिटी व्हॅनमध्ये 3-3 खोल्या आहेत.
  • प्रत्येक खोलीत वेगळे टॉयलेट आहे
  • प्रत्येक वॅनिटी व्हॅनमध्ये झोपण्याची आणि डायनिंगची व्यवस्था आहे.
  • यामध्ये एअर कंडीशनरही आहेत

केतन रावल यांनी सांगितले की, मुंबईमध्ये पुन्हा एकदा कंम्पलीट लॉकडाऊनची स्थिती आहे. अशा वेळी पोलिसांना जेव्हाही व्हॅन्सची गरज भासेल. तेव्हा त्या तत्काळ पुरवल्या जातील. सध्या केतन यांच्या जवळ 24 व्हॅनिटी व्हॅन्स रेडी आहेत. गरज पडली तर ते तत्काळ व्हॅन्स उपलब्ध करतील.

बातम्या आणखी आहेत...