आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर रिसर्च:बॉलीवूडच्या टॉप-10 चित्रपटांची 4 महिन्यांत 967 कोटींची कमाई, टॉलीवूडच्या 2 चित्रपटांची 2 महिन्यांत 2,234 कोटी कमाई

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रथमच 38 दिवसांत दोन चित्रपटांचे कलेक्शन 1-1 हजार कोटींवर

​​बॉलीवूडला सध्या दक्षिण भारतातील टॉलीवूड या चित्रपट उद्योगाकडून जोरदार लढत मिळत आहे. यामुळेच या वर्षी जानेवारी ते एप्रिल यादरम्यान बॉलीवूडचे टॉप-१० चित्रपट फक्त ९६६.६५ कोटी रुपयांचेच कलेक्शन करू शकले. याउलट टॉलीवूडच्या आरआरआर आणि केजीएफ-२ या दोन चित्रपटांनी फक्त २ महिन्यांतच २,२३४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात प्रथमच ३८ दिवसांतच दोन-दोन चित्रपटांनी १-१ हजार कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. आरआरआरने १,१२७ कोटींचे, तर केजीएफ-२ ने १,१०७ कोटींचे कलेक्शन केले. याआधी ‘दंगल’ (२०२४ कोटी) आणि बाहुबली-२ (१८१० कोटी) हे दोन चित्रपट हजार कोटी रुपयांच्या क्लबमध्ये होते.

पडद्यावर १३, ओटीटीवर १० चित्रपट
या वर्षी जानेवारी ते एप्रिलदरम्यान थिएटरमध्ये एकूण १३ बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाले, तर वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १० नवे चित्रपट आले. त्यात गहराइयां, दसवीं, शर्मा जी नमकीन, जलसाचा समावेश.

पुढे? मेमध्ये ४ मोठे चित्रपट येणार
मेमध्ये रणबीर सिंहचा जयेशभाई जोरदार (१३ मे), कार्तिक आर्यनचा भूल-भुलैया २ (२० मे), कंगना रनौतचा धाकड़ (२० मे) आणि आयुष्मान खुराणाचा अनेक (२७ मे) प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...