आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई हायकोर्टाने गेल्या आठवड्यात लैंगिक गुन्ह्यांविरुद्ध मुलांचे संरक्षण (POCSO) अंतर्गत दोषी ठरलेल्या एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. कोर्ट म्हणाले की, अक्कलदाढी नसणे हा बलात्कार पीडितेचे वय सिद्ध करण्याचा ठोस पुरावा असू शकत नाही.
महरबान हसन बाबू याच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. बाबू खानने बलात्कार आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत दोषी ठरविल्यानंतर त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. त्याच्यावर लग्नाच्या बहाण्याने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि तिला गर्भवती केल्याचा आरोप लावण्यात आला होता.
डेंटिस्टच्या साक्षीवर सुनावली गेली होती शिक्षा
प्रकरणाचा तपशील देताना न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई म्हणाले की, रायगड जिल्ह्याच्या विशेष न्यायालयाने बाबू खानला 18 डिसेंबर 2019 रोजी दोषी ठरवताना दंतचिकित्सकाच्या साक्षीवर विश्वास ठेवला होता, ज्याने पीडितेची वैद्यकीय आणि रेडिओग्राफिक दोन्ही तपासण्या करून तिचे वय तपासले होते. यात दंतचिकित्सकाने सांगितले होते की, त्याआधारावर पीडितेचे वय अंदाजे 15 ते 17 वर्ष सांगितले होते. आपल्या रिपोर्टमध्ये चिकित्सकांनी सांगितले होते की, त्या पीडितेला तिसरी दाढ म्हणजे अक्कलदाढ आली नाही. त्यावरून वय सुमारे 15 ते 17 वर्षे असल्याचे सांगितले. तथापि, उलटतपासणी केली असता, त्याने कबूल केले की 18 वर्षांच्या वयानंतर अक्कलदाढ कधीही येत नाहीत.
न्यायमूर्ती प्रभुदेसाई यांनी आरोपीची शिक्षा रद्द केली
वैद्यकीय न्यायशास्त्राचा संदर्भ देत न्यायमूर्ती प्रभुदेसाई म्हणाले, दुसरी दाढ 12 ते 14 वर्षांच्या दरम्यान उगवते. तर तिसरी अक्कलदाढ 17 ते 25 वर्षांच्या दरम्यान येते. अक्कल दाढ निघणे हे जास्तीत जास्त हे संकेत देऊ शकतात की, त्या व्यक्तीचे वय 17 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. परंतू, अक्कलदाढ नसणे किंवा असणे हे सिद्ध करू शकत नाही की, व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे. या संदर्भात न्यायमूर्ती प्रभुदेसाई म्हणाले की, फिर्यादी पक्षाने पीडितेचे वय सिद्ध करण्यासाठी साक्षीदार तपासले नाहीत आणि त्यामुळे ते अप्रमाणित राहिले. त्यामुळे शिक्षा बाजूला ठेवून बाबू खानची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
पीडितेसोबत लग्न करायची होते आरोपीला
आरोपी बाबू खानने दावा केला की, त्याला पीडितेशी लग्न करायचे आहे. उत्तर प्रदेशातून परतल्यानंतर त्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती सापडली नाही आणि पोलिसांनी त्याला अचानक अटक केली. त्याने सांगितले की, मला त्या मुलीशी लग्न करायचे आहे आणि तिच्या मुलाचीही काळजी घ्यायची आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.