आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Bombay High Court Dismisses Actor Kangana Ranaut's Plea Seeking To Quash The Defamation Proceeding Initiated Against Her By Lyricist Javed Akhtar; News And Live Updates

जावेद अख्तर बदनामी प्रकरण:कंगना रणोतवर चालणार फौजदारी खटला, मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली खटला रद्द करण्याची याचिका

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रणोतला मोठा झटका दिला आहे. कंगनाने न्यायालयात जावेद अख्तर यांच्याकडून दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत कंगनाला मोठा धक्का दिला आहे. जावेद अख्तर यांनी कंगना रणोतवर बदनामी करण्याच्या आरोपांखाली तक्रार दाखल केली होती. परंतु, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल केली.

ही दाखल केलेली याचिका रद्द करण्यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सदरील प्रकरणात अभिनेत्रीला मार्च 2020 ला जामीन मिळाला होता. परंतु, जारी करण्यात आलेले वॉरंट रद्द करण्यासाठी अभिनेत्रीने न्यायालयात धाव घेतली. परंतु, सुनावणीदरम्यान अभिनेत्रीने न्यायालयात हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले होते.

प्रकरण काय?
जावेद अख्तर यांच्यावर निराधार आरोप करत बदनामी करण्याच्या प्रयत्न केल्याचा आरोप कंगना रणोतवर आहे. याप्रकरणी त्यांना अनेक वेळा समन्सदेखील बजावण्यात आले. परंतु, ती सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर न राहिल्याने कंगनाविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, नंतर न्यायालयाने यात प्रकरणात जामीन मंजूर केला होता.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दाखल करण्यात आला होता गुन्हा

 • जावेद अख्तर यांनी 2 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांचे वकील निरंजन मुंदर्गी यांच्यामार्फत खाजगी तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्याने अभिनेत्री कंगना रणोतवर भारतीय दंड संहितेच्या कलम 499 (मानहानी) आणि कलम 500 (बदनामीसाठी शिक्षा) अंतर्गत आरोप लावले होते.
 • अख्तरने आपल्या याचिकेत स्वत:च्या प्रतिष्ठेबद्दल आणि 2010-2016 पर्यंत राज्यसभेचे सदस्याचा उल्लेख केला आहे.
 • कंगानाने आपल्या 57 मिनटांच्या मुलाखतीत माझ्यावर अनेक गंभीर आणि निराधार आरोप केल्याचा दावा केला आहे.
 • हृतिक रोशनवर दाखल केलेला खटला मागे घेण्याची धमकी मी दिली होती असेही आरोप तीने आपल्या मुलाखतीत लावला असल्याचे म्हटले आहे.
 • अख्तरने आपल्या याचिकेत म्हटले होते की, कंगनाने त्याला मुलाखतीत सुसाईड गँगचा भाग सांगितला होता. तीने तक्रार मागे घेतली नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले होते.
 • 3 डिसेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तरचा जबाब नोंदवला होता.

कंगनाने मुलाखतीत काय म्हटले होते?
जावेद अख्तरने तिला घरी बोलावून धमकी दिली होती. कंगनाच्या मते, अख्तर म्हणाला होता की राकेश रोशन आणि त्याचे कुटुंब खूप मोठे लोक आहेत. जर त्यांनी त्याची माफी मागितली नाही तर ते त्याला तुरुंगात टाकू शकतात असे कंगानाने एका मनोरंजन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही यापूर्वी सोशल मीडियाद्वारे असाच दावा केला होता.

बातम्या आणखी आहेत...