आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Bombay High Court Dismisses Former Mumbai Police Commissioner Parambir Singh's Petition Challenging Preliminary Inquiries Initiated Against Him By Maharashtra Goverment

परमबीर सिंहांना दिलासा नाहीच!:माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाचा दणका; चौकशीविरोधातली याचिका फेटाळली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही याचिका ‘नॉन मेंटेनेबल’ आहे असे म्हणत उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीच्या आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या कारवाईविरोधात परमबीर सिंह यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र आता उच्च न्यायालयाकडून ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. यामुळे परमबीर सिंहांना दिलासा मिळणार नाहीये.

परमबीर सिंहांनी आपल्याविरोधात महाराष्ट्र सरकराने सुरू केलेल्या दोन प्रकरणातील तपासाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. यामध्ये सेवेसंदर्भातल्या नियमांचे उल्लंघन आणि भ्रष्टाचाराचे आरोप अशा दोन प्रकरणांचा समावेश होता. ही याचिका ‘नॉन मेंटेनेबल’ आहे असे म्हणत उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.

याचिकेमध्ये परमबीर सिंहांनी काय म्हटले होते?
या याचिकेमध्ये परमबीर सिंहांनी म्हटले होते की, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण आपण उघड केले होते. यामुळे आपल्याला लक्ष्य करण्यासाठी हे आरोप ठेऊन तपास केला जातोय. तसेच 1 एप्रिल 2020 आणि 20 एप्रिल 2021 रोजी माझ्या चौकशीचे आदेश देण्यात आले. मात्र, ज्या वेळी मी पत्राद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप केले, त्यानंतर माझी चौकशी सुरू करण्यात आल्याचे परमबीर सिंह यांनी याचिकेमध्ये म्हटले होते.

राज्य सरकारने काय म्हटले?
या याचिकेविरोधात राज्य सरकारने न्यायालयात आपली बाजी मांडली. राज्य सरकारने म्हटले आहे की, 'या विषयासंदर्भात दाद मागण्यासाठी न्यायालय नाही तर सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल हीच योग्य जागा आहे. कारण परमबीर सिंह यांनी सेवेत असताना केलेल्या काही चुकीच्या गोष्टींविषयी त्यांची सेवांतर्गत चौकशी सुरू आहे'

बातम्या आणखी आहेत...