आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हायकोर्टाने सुनावले:कुणी मॅनहोलमध्ये पडले तर मनपा जबाबदार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उघड्या मॅनहोलमध्ये कुणी पडले तर त्याला बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) जबाबदार असेल, असे मुंबई हायकोर्टाने सुनावले आहे. राज्यात रस्त्यांवरील खड्डे व उघड्या मॅनहाेलच्या वाढत्या संख्येबाबत दाखल याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि अभय आहुजा यांच्या पीठाने सुनावणी केली. बीएमसीच्या वकिलांनी सांगितले की, मनपा युद्धपातळीवर मॅनहोलची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर कोर्ट म्हणाले, तुमचे काम चांगले आहे, मात्र उघड्या मॅनहोलमुळे दुर्घटना घडल्यास आम्ही बीएमसीलाच जबाबदार धरू.

बातम्या आणखी आहेत...