आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हायकोर्टाचे निकाल मराठीत ऑनलाइन उपलब्ध:बुधवारपासून संकेतस्थळावर अपलोड करण्यास सुरुवात केली आहे

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाने आपले मराठी भाषांतरित निकाल-निवाडे बुधवारपासून संकेतस्थळावर अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. बाॅम्बे हायकोर्टाच्या संकेतस्थळावर (bombayhighcourt.nic.in) त्यासाठी स्वतंत्र टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर २० फेब्रुवारीचे तीन मराठी भाषांतरित निकाल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

संकेतस्थळावरील होम पेजवर ‘निवडक निर्णय’ या टॅबची निवड करावी लागेल. पीठाचे न्यायमूर्ती डी. एच. ठाकूर, न्यायमूर्ती कमल खाता, न्यायमूर्ती अभय आहुजा, न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांनी दिलेले निकाल त्यावर पाहता येऊ शकतात. निकालांची ही भाषांतरित व्यवस्था केवळ मातृभाषेतून निकाल समजून घेता यावा या उद्देशाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामागे कोर्टाच्या आदेशांच्या पालनाबद्दल सूचित करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्टीकरणही संकेतस्थळावर आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी जानेवारीत सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांतून देण्याच्या सेवेचा प्रारंभ केला होता.

बातम्या आणखी आहेत...