आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेटलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दिल्लीत दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन समेट घडवून आणला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वारंवार महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्ये केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली तेव्हा बोम्मईंनी ‘हे टि्वटर हँडलच आपले नाही,’ असा बचाव शहांसमोर केला, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे अकाउंट ‘बसवराज बोम्बई’ यांच्या नावाने आहे. विशेष म्हणजे त्यावर महाराष्ट्रविरोधी जी वक्तव्ये आजपर्यंत झाली आहेत त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच टि्वटरवर प्रत्युत्तरेही दिली आहेत. मग बोम्मईंच्या दाव्यावर त्यांनी विश्वासउर्वरित. पान १२
बोम्मईंचा दावा फोल का वाटतो { @BSBommai टि्वटर अकाउंटला ‘ब्ल्यू टिक’ आहे. याचा अर्थ ते पडताळणी करूनच अधिकृत ठरवण्यात आलेले आहे. { बोम्मईंनी याच ट्वीटद्वारे सांगली व सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केला होता. त्यावरून वादंग झाले. { महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी या वादग्रस्त इशाऱ्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतरही कर्नाटक सरकार आपल्या दाव्यांवर ठाम असल्याचे बोम्मईंनी वारंवार सांगितले होते. { ज्या अकाउंटमुळे दोन राज्यांत हिंसाचाराची परिस्थिती निर्माण झाली ते जर ‘फेक’ असेल तर बोम्मईंनी तेव्हाच तसे स्पष्टीकरण का दिले नाही? { बोम्मईंच्या या अकाउंटद्वारे कर्नाटक व केंद्र सरकारचे महत्त्वाचे निर्णय, भाजपचे कार्यक्रम प्रसिद्ध केले जातात. { विशेष म्हणजे अमित शहांसमोर या फेक अकाउंटविरोधात गुन्हा दाखल करण्याची हमी देणाऱ्या बोम्मईंनी २४ तास उलटले तरी अद्याप एफआयआर का दाखल केला नाही? त्यावरील मेसेजही डिलिट केलेले नाहीत.
फेक अकाउंटमागचा सूत्रधार राज्य सरकारने शोधून काढावा बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्ये करून वाद निर्माण केला. यामुळे सीमाभागात तणाव निर्माण झाला. फेक अकाउंटमागचा सूत्रधार कोण आहे हे शोधून काढायला हवे. राज्याच्या एकसंधतेला धक्का लागेल अशी कृती विरोधक कधीच करणार नाहीत. तरीही सरकारला शंका वाटत असेल तर ‘दूध का दूध, पानी का पानी समोर’ आलेच पाहिजे. - अजित पवार, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र
महाराष्ट्र सरकारचीही गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ कर्नाटक सरकार एफआयआर नोंदवत नसेल तर ज्या ट्वीटमुळे महाराष्ट्रात अशांतता पसरली त्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचा राज्य सरकारकडेही अधिकार आहे. पण शिंदे-फडणवीस ते करण्यास तयार नाहीत. शिंदे म्हणाले, ‘आम्हाला या विषयात जायचे नाही आणि राजकारण करायचे नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र बोम्मईंनी ‘याआधीच का खुलासा केला नाही?’ असा प्रश्न विचारून त्यांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.