आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र-कर्नाटक:सीमावाद सामंजस्याने सुटला पाहिजे : शेलार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सामंजस्याने सुटला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मात्र कुणी अरे केले तर आम्ही कारे करू. कर्नाटकच्या बाजूने कुठल्याही प्रकारचा आक्रमकपणा झाल्यास आम्ही त्याला उत्तर देऊ, असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अॅड.आशिष शेलार यांनी शनिवारी (३ डिसेंबर) दिला. सीमाभागातील कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई येत्या ६ डिसेंबरला बेळगावला जाणार आहेत. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्र्यांना बेळगावात पाठवू नका, अशी भूमिका घेतली आहे. यावर आशिष शेलार यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, सीमाभागातील गावांवर महाराष्ट्राचा पहिला अधिकार आहे. जत भागात पाण्यासंदर्भातील योजना पूर्ण करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. देशात कुणालाही कुठेही जाण्याची परवानगी आहे. महाराष्ट्रातील मंत्री कर्नाटकात जाणार असतील तर त्यांना कुणी थांबवू शकणार नाही, असे शेलार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...